अंगप्रदर्शन करून झालं आता 'हे' काम करू लागलीये उर्फी; नेटकरी म्हणाले....

 ज्या कवितेचं सगळीकडेच कौतुक होताना दिसत आहे. 

Updated: Sep 15, 2022, 06:57 PM IST
अंगप्रदर्शन करून झालं आता 'हे' काम करू लागलीये उर्फी; नेटकरी म्हणाले.... title=

Urfi Javed Poem: इन्स्टाग्रामवर नेहमीच खळबळ माजवणाऱ्या उर्फी जावेदने (Urfi Javed) पुन्हा एकदा आपल्या नवीन टॅलेंटचे दर्शन देत चाहत्यांना भुरळ घातली आहे. कपड्यांवरून जगभरातील लोकांकडून नेहमीच टोमणे ऐकणाऱ्या या अभिनेत्रीचे आज सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत. 

याला कारण म्हणजे तिनं लिहिलेली कविता. होय नुकतीच उर्फीने सोशल मीडियावर (Urfi Javed Social Media Post) एक कविता पोस्ट केली आहे ज्या कवितेचं सगळीकडेच कौतुक होताना दिसत आहे. 

उर्फी जावेद फॅशन क्वीनसोबतच कवयित्रीही झाली आहे. ऐकून धक्का बसला ना तुम्हाला? पण सत्य हे आहे. उर्फीने हे कौशल्य स्वतःहून आपल्या चाहत्यांसमोर उघड केले आहे. उर्फीच्या नव्या टॅलेंटबद्दल ऐकून तुम्हीही प्रभावित व्हाल. उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक कविता शेअर केली आहे, जी तिनं स्वत: खूप पूर्वी लिहिली होती. 

उर्फीने असेही सांगितले की ती पूर्वी कविता आणि गाणी लिहायची. तिला कविता लिहिण्याची आवड होती. उर्फीची कविता अतिशय भावूक आणि हृदयस्पर्शी असून तिची ही कविता वाचून तिचं चाहते भलतेच प्रभावित झाले आहेत. 

उर्फी जावेद नेहमीच आपल्या विचित्र फॅशनसाठी (Urfi Javed Bold Fashion) ओळखली जाते. तिच्या म्हणण्यानूसार ती स्वतःहून आपल्या ड्रेसवर मेहनत घेते आणि आपले ड्रेस डिझाईन करते.