मुंबई : सध्या सिनेसृष्टीत अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत. तर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या प्रेमाची कबूलीही दिली आहे. आता या यादीत आता एका बॉलिवूड अभिनेत्रीचा सहभाग होतोय. अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तापसी तिचा बॉयफ्रेंड बॅडमिंटनपटू मॅथियाससोबत विवाहबंधनात अडकणार आहे. मॅथियास हा सध्या भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन दुहेरी संघाचा प्रशिक्षक आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार तापसी यावर्षी राजस्थानमध्ये सातफेरे घेणार असल्याचं समजतंय, तापसीच्या लग्नाची बातमी समोर येताच अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे. तर सोशल मीडियावर तापसीची चर्चा जोरदार असल्याचं दिसत आहे.
तापसी ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे आत्तापर्यंत तापसीने बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. तापसीने अनेक मोठ मोठ्या कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. तापसी पन्नूने अवघ्या कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. तापसीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तापसी नेहमीच तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत असते. तापनी एखादा फोटो शेअर करताच लगचे त्या फोटोची चर्चा होते. चाहते तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफविषयी जाणून घेण्यासाठी कायमच उत्सुकही असतात. आता तापसीच्या लग्नाची बातमी समोर येताच तिच्या चाहत्यांना आनंद होताना दिसत आहे.
तापसी अनेकदा तिच्या प्रियकरासोबत सार्वजनिक ठिकाणी दिसते. अनेकदा हे दोघं एकत्र स्पॉट होत असतात. कधी एखाद्या इवेंटमध्ये तर कधी हे दोघं रेस्टॉरंटबाहेर स्पॉट होतात. अभिनेत्रीने तिची लव्हलाईफ कधीच कोणापासून लपवून ठेवली नाही. १० वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ही जोडी लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. तापसीने आपल्या विवाहासाठी राजस्थानमधील उदयपूरची निवड केली असल्याचे वृत्त आहे. या ठिकाणी तापसीचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, तापसीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
2010 मध्ये तापसीने 'झुम्मंडी नादम' या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तापसीने 2013 मध्ये 'चश्मे बद्दूर' या चित्रपटामधून पदार्पण केलं. आत्तापर्यंत तापसी पन्नू अनेक हिट सिनेमा दिले आहेत. अभिनेत्रीने केवळ हिंदीच नाही तर तेलुगू आणि तमिळ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. 'जुडवा 2', 'गेम ओव्हर', 'बदला', 'नाम शबाना', 'पिंक' आणि 'शाबाश मिठू' असे अनेक चित्रपट आहेत.