11 वर्षांनंतर पुन्हा पावसात भेट, कडकडून मिठी, व्हिडीओ पाहून चाहत्यांना आठवला तो क्षण

'स्त्री 2' फेम अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या प्रचंड चर्चेत आहे. नुकतीच ती मुंबईतील एका कार्यक्रमात पोहोचली होती. येथील तिचा एक व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे.   

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 25, 2024, 01:28 PM IST
11 वर्षांनंतर पुन्हा पावसात भेट, कडकडून मिठी, व्हिडीओ पाहून चाहत्यांना आठवला तो क्षण title=

Shraddha Kapoor And Aditya Roy Kapur : श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर नुकतेच मुंबईतील एका कार्यक्रमात एकत्र पोहोचले होते. यावेळी दोघांनी मॅचिंग ब्लॅक आउटफिट घातले होते. दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आशिकी 2' चित्रपटामधील त्यांची केमिस्ट्री खूप चर्चेत होती. त्यानंतर 11 वर्षांनी ते दोघे पुन्हा एकत्र आले होते. दोघांना पावसात एकत्र पाहून चाहत्यांना देखील  'आशिकी 2' चित्रपटाची आठवण झाली. मुसळधार पाऊस, श्रद्धाची साडी आणि आदित्यचा ब्लेझर हा योगायोग आहे असं देखील चाहते व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया देत आहेत. 

आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा पावसातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड करत आहे. दोघांनीही एकमेकांना पाहताच मिठी मारली आणि मग गप्पा मारल्या. यावेळी दोघांनी देखील काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. 

11 वर्षांनंतर आदित्य आणि श्रद्धा पुन्हा एकत्र 

आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरला 11 वर्षांनंतर एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांकडून देखील व्हिडीओवर कमेंट्सचा पूर आला आहे. एका चाहत्याने म्हटलं आहे की, पावसात श्रद्धा आणि आदित्यचे पुनर्मिलन...हे मला  'आशिकी 2' ची आठवण करून देते. तर दुसऱ्या एका चाहत्याने म्हटलं आहे की, अजून कोणाच्या लक्षात आले आहे का किंवा फक्त माझ्या लक्षात आले आहे की? ते दोघे फक्त एकत्रच नाहीत तर पाऊस देखील आहे. ब्लेझरमध्ये आदित्य आणि साडीमध्ये श्रद्धा. हा तर योगायोग आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

श्रद्धाच्या 'स्त्री 2' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. तसेच अनेक चित्रपटाचे कमाईच्या बाबतीत रेकॉर्ड मोडले आहे. जगभरात या चित्रपटाने 823 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर आदित्य रॉय कपूर हा 'मेट्रो इन दिनों' या चित्रपटात दिसणार आहे.