Mother's Day: सारा अली खानचा अनोखा मातृदिन

'माझ्या आईची आई...'

Updated: May 10, 2020, 06:25 PM IST
Mother's Day: सारा अली खानचा अनोखा मातृदिन title=

मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं स्थान हे अत्यंत मोलाचं असतं. प्रत्येक दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्याचप्रमाणे आज संपूर्ण जगात मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. १० मे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा करण्यात येतो. देशात लॉकडाऊन असल्यामुळे कोणालाच मनाप्रमाणे मातृदिन साजरा करता आला नाही. पण सोशल मीडियावर प्रत्येकाने वेग-वेगळ्या प्रकारे आपल्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

बॉलिवूकरांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून मातृदिनाच्या शुभेच्छा आपल्या आईला दिल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने देखील आपल्या आई आणि आजीचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये साराचं तिच्या आई आणि आजीसोबत असलेलं प्रेमळ नातं खूप काही सांगत आहे. सध्या त्यांचा हा फोटो तुफान व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Meri Maa ki Maa Thank you for creating Mommy  #HappyMothersDay

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये 'माझ्या आईची आई...' असं लिहिलं. सारा कायम तिची आई आमृतासोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. शिवाय सोशल मीडियावर  तिच्या चाहत्यांची संख्या देखील देखील फार मोठी आहे. 

या लॉकडाऊन दरम्यान ती आपला संपूर्ण वेळ आई आणि भाऊ इब्राहिमसोबत घालवत आहे. सांगायचं झालं तर सारा आताच्या घडीच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती लवकरच अभिनेता वरूण धवनसोबत 'कुली नं १' चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सारा आणि वरूण पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.