घटस्फोटानंतर Samantha बनली आणखीनंच Strong, पाहून सगळेच हैरान

 नव्या वर्षात तिचा आणखीनंच Strong अंदाज पाहायला मिळत आहे.

Updated: Jan 15, 2022, 03:49 PM IST
घटस्फोटानंतर Samantha बनली आणखीनंच Strong, पाहून सगळेच हैरान title=

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ( samantha ruth prabhu ) हिने 2022 मध्ये तिच्या फिटनेसकडे पूर्ण लक्ष देण्याचे ठरवले आहे. काही दिवसांपूर्वी  तिने जिममधील एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना फिटनेसची प्रेरणा दिली होती. आता तिचा नवा व्हिडिओ पाहून चाहत्यांना घाम फुटणार आहे.

समंथाने इन्स्टा स्टोरीवर हेवी वेट लिफ्टिंग करतानाचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. अभिनेत्रीने 80 किलो वजन उचलतानाचा तिचा व्हिडिओ शेअर केला आहे.  

होय, 80 किलो... 5 किलो पिठाची पोती उचलताना अनेकांना त्रास होतो, पण समंथाने हे करत सगळ्यांनाच चकीत केले आहे. समंथा पूर्ण ताकदीने वजन उचलताना दिसली. तिने 80 किलो वजन उचलण्यापूर्वी 75 आणि 78 किलो वजन उचलले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

समंथा गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत होती. नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर तिच्या बद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जात होत्या.

आता समंथाने आपल्या कामाला सुरुवात केली आहे. आणि नव्या वर्षात तिचा आणखीनंच Strong अंदाज पाहायला मिळत आहे.