ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार, जाणून घ्या

अभिनेत्री वर्सोवा येथील त्यांच्या बंगल्यातून ऑटोने केमिस्टमध्ये जात होत्या.

Updated: Nov 17, 2021, 10:54 PM IST
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार, जाणून घ्या title=

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री आणि गायिका सलमा आगा मुंबईत दरोड्याची शिकार झाल्या आहेत. काही दुचाकीस्वारांनी मुंबईत सलमा यांची हॅण्डबॅग हिसकावून घेतली. बॅगेत त्यांचा मोबाईल, काही पैसे, चाव्या व इतर आवश्यक वस्तू होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमा आगा यांनी त्यांना सांगितलं की, त्या शनिवारी वर्सोवा येथील त्यांच्या बंगल्यातून ऑटोने केमिस्टमध्ये जात होत्या. त्यानंतर दुचाकीवरून 2 जण भरधाव वेगात आले आणि त्यांनी त्यांची बॅग हिसकावून घेतली आणि ते पळून गेले.

पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही
सलमा यांनी घटनेनंतर लगेच वर्सोवा पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार केली मात्र पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास स्पष्टपणे नकार दिल्याचा त्यांचा दावा आहे. सलमा यांनी मीडियाला सांगितलं की, 'बॅगमध्ये 2 मोबाईल फोन, काही रोख रक्कम आणि इतर काही आवश्यक वस्तू होत्या.  ही घटना ताबडतोब पोलीस ठाण्यात पोहोचली जिथे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, एफआयआर नोंदवायला किमान 3 तास लागतील. त्यानंतर आज म्हणजेच मंगळवारी माझा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मी या घटनेची माहिती ट्विट करून मुंबई पोलिसांना दिली होती.

घटना दररोज घडतात
सलमा पुढे म्हणाल्या, 'परिसरात अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही, याआधीही चोरीच्या अनेक घटना ईथे घडल्या आहेत. दरोडेखोरांकडे महागड्या दुचाकी होत्या आणि घटनास्थळाजवळ पोलिसांची नाकाबंदी देखील होती. या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यास उशीर झाल्याचं कारण विचारले असता वर्सोवा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "आम्ही घटनेच्या दिवशी एफआयआर नोंदवतो, मात्र अभिनेत्रीने सांगितलं की तिच्याकडे वेळ नव्हता आणि त्या नंतर येतील. " आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. जेव्हा त्या पोलिस ठाण्यात येतील तेव्हा आम्ही एफआयआर नक्कीच नोंदवू.''