फेअरनेस क्रीमला No म्हणणाऱ्या साई पल्लवीचं Kissing सीनबाबत लक्षवेधी वक्तव्य

आघाडीच्या दाक्षिणात्य अभिनेत्रींमध्ये तिच्याही नावाचा उल्लेख केला जातो.   

Updated: Dec 22, 2021, 06:06 PM IST
फेअरनेस क्रीमला No म्हणणाऱ्या साई पल्लवीचं Kissing सीनबाबत लक्षवेधी वक्तव्य  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : साई पल्लवी (Sai Pallavi) या अभनेत्रीनं अतिशय कमी वेळामध्ये तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये कमालीची लोकप्रियता मिळवली आहे. दाक्षिणात्य चित्रपटविश्वात झळकणाऱ्या साईनं विविधभाषी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. 

आघाडीच्या दाक्षिणात्य अभिनेत्रींमध्ये तिच्याही नावाचा उल्लेख केला जातो. 

सध्या ती आगामी 'श्याम सिंह रॉय (Shyam Singha Roy)' या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. 

हल्लीच तिनं याच चित्रपटाच्या निमित्तानं एका मुलाखतीमध्ये किसिंग सीनसंदर्भातील प्रश्नावर लक्षवेधी उत्तर देत अनेकांच्याच तोंडावर कुलूप लावलं. 

चित्रपटामध्ये अभिनेता नानी आणि अभिनेत्री कृतिका शेट्टी यांच्यामध्ये एक किसिंग सीन आहे. याचविषयी या मुलाखतीत प्रश्न केला गेला. 

Kissing सीनमध्ये तुम्हा दोघांपैकी अधिक संकोचल्यासारखं कोणाला वाटत होतं? असा प्रश्न विचारताच साईनं समोरच्या व्यक्तीला रोखलं. 

'अशा पद्धतीचे प्रश्न अतिशय विचित्र वाटतात. सीनच्या आधी अर्थातच दोन्ही कलाकारंनी चर्चा केली आणि एकमेकांशी सहज झाल्यानंतरच सीन केला. 

पण, असे प्रश्न फारच विचित्र परिस्थितीत टाकतात', असं साई म्हणाली. पण, तिच्या असं म्हणण्यानंतरही हाच प्रश्न विचारला गेल्यामुळं ती काहीशी नाराज झाली. 

हे कलाकार आहेत, असं म्हणत साई पल्लवीनं सदर प्रश्नावर आपली नाराजी तीव्र शब्दांत व्यक्त केली. 

तिच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. 

फेअरनेस क्रिमला नकार देत नैसर्गित सौंदर्यालाच प्राधान्य देणाऱ्या साईचा हा खंबीरपणा पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकून जात आहे.