Rhea Chakraborty Drug Case: रियानं रकुल प्रीतसह घेतलं 'या' सेलिब्रिटीच्या मुलीचं नाव

त्यांच्या अडचणींत वाढ होणार ? 

Updated: Sep 15, 2020, 12:35 PM IST
Rhea Chakraborty Drug Case: रियानं रकुल प्रीतसह घेतलं 'या' सेलिब्रिटीच्या मुलीचं नाव  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत Sushant Singh Rajput आत्महत्या प्रकरणी समोर आलेल्या ड्रग्जच्या मुद्द्याची तपासणी करणाऱ्या नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीच्या हाती आणखी महत्त्वाची माहिती लागली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ पाहणाऱ्या NCB च्या कारवाईमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नावं समोर आली असल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. 

एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत ताब्यात घेण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीसोबतच १६ जणांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशी सत्रामध्ये अभिनेता सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान, अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि डिझायनर सिमोन खंबाटा यांची नावं घेतली आहेत. 

अद्यापही त्याबद्दलची स्पष्टोक्ती करण्यात आलेली नाही. शिवाय यापैकी कोणालाही समन्सही पाठवण्यात आलेलं नाही. पण, आता त्यांची नावं समोर आल्यामुळं पुढे या प्रकरणाला नेमकं कोणतं वळण मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

 

दरम्यान, सुशांत आत्महत्या प्रकरणी जोडल्या गेलेल्या ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासह ६ जणं २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. सध्या या प्रकरणीचा तपास महत्त्वाच्या टप्प्यांवर आला असून, यांमध्ये होणारे गौप्यस्फोट सातत्यानं नवी माहिती समोर आणत आहेत.