Rakhi Sawant: राखी सावंतने राहुल गांधींना दिला लोकसभा निवडणूक जिंकण्याचा मंत्र, म्हणाली… पाहा Video

Rakhi Sawant Viral Video: राखी सावंतने काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना फुकटचा सल्ला दिला आहे. तिचा हा सल्ला ऐकून काँग्रेसचे कार्यकर्ते सैरभैर झाल्याचं दिसून येतंय. 

Updated: Jul 12, 2023, 09:11 PM IST
Rakhi Sawant: राखी सावंतने राहुल गांधींना दिला लोकसभा निवडणूक जिंकण्याचा मंत्र, म्हणाली… पाहा Video title=
Rakhi Sawant, Rahul Gandhi

Rakhi Sawant On Rahul Gandhi: ड्रामा क्वीन राखी सावंत लोकांचं मनोरंजनासाठी कोणतीही कसर सोडत नाही. तिच्या विचित्र वागण्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. राखी सावंतने (Rakhi Sawant) दोन दिवसापूर्वी युजर्सला महागाईच्या काळात टोमॅटो पिकवण्यासाठी जुगाड सांगितला होता. अशातच आता राखी सावंतने काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना फुकटचा सल्ला दिला आहे. तिचा हा सल्ला ऐकून काँग्रेसचे कार्यकर्ते सैरभैर झाल्याचं दिसून येतंय. नेमकं काय म्हणाली राखी सावंत?

राखीने काय सल्ला दिला?

नेहमीप्रमाणे राखी पापाराझींनी घेरलं. त्यावेळीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल असल्याचं दिसतंय. राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होऊ शकतात का?, असा सवाल पापाराझींनी केला. यावर राखी म्हणाली की हो नक्कीच, मला वाटतं की जर राहुल गांधी बिग बॉसमध्ये आले तर ते नक्कीच देशाचे पंतप्रधान होतील, असं राखी (Rakhi Sawant On Rahul Gandhi) म्हणते. राखीच्या उत्तरामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. 

राहुल गांधी यांनी बिग बॉसमध्ये का यावं? असा प्रश्न राखीला विचारला गेला. त्यावर राखीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. जो कोणी बिग बॉसमध्ये येतो, त्याचा आयुष्य बनतं, राहुल गांधींचंही आयुष्य बनेल. राहुल गांधींना बिग बॉसमध्ये कास्ट केलं पाहिजे, कारण त्यांनी बिग बॉसमध्ये प्रवेश केला तर ते पुढची निवडणूक जिंकतील, असा विश्वास देखील राखीने व्यक्त केलाय. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा Video

दरम्यान, राखी सावंत मोठ्या नेत्यांबद्दल उघडपणे बोलत असते. तिचा हा रोखठोकपणा अनेकांना आवडतो. त्यामुळे तिची फॅन फॉलोविंग देखील मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपूर्वी राखीने भावनिक वक्तव्य केलं होतं. मी एकटी काय काय करणार... मी अशा एका व्यक्तीच्या शोधात आहे जो माझ्या दोन लेकरांचा बाप होऊ शकतो आणि आयुष्यभर माझी साथ देऊ शकतो, असं राखी म्हणाली होती. त्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडल्याचं दिसून आलं होतं.