मुंबई : साऊथ सिनेमांमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियामणी नुकतीच विवाहबंधनात अडकली. मुस्तफा राज याच्याशी प्रियामणीने प्रेमविवाह केला. प्रियामणी आणि मुस्तफा यांनी रजिस्टार ऑफिसरच्या उपस्थितीत विवाहा केला.
आता बंगळुरुतील एका अलिशान हॉटेलमध्ये नातेवाईक आणि मित्रपरिवारासाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात येणार आहे.
प्रियामणीने तामिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी अशा भाषांमधील सिनेमांमध्ये काम केले आहे. २००७ साली ‘परुथीवीरन’ या तामिळ सिनेमासाठी प्रियामणीला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. प्रियामणीचा पती मुस्तफा राज मुंबईतील उद्योगपती असून, सेलिब्रिटी क्रिकेट लीगची कल्पना त्याचीच असल्याचं बोललं जातं.
Happy to announce that Mustufa Raj and I got engaged on Friday the 27th at a close and private function at home! pic.twitter.com/0QX51YLdUQ
— priyamani (@priyamani6) May 29, 2016
विवाहनबंधनात अडकण्याआधी प्रियामणी आणि मुस्तफा यांनी एका संगीत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. प्रियामणीची मैत्रीण पारुल यादव हिने या संगीत कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.