अश्लील व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात

पाहा काय आहे नेमकं प्रकरण.... 

Updated: Nov 6, 2020, 08:11 AM IST
अश्लील व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात   title=
छाया सौजन्य - इन्स्टाग्राम

पणजी : वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडे हिच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच गोव्यातील चित्रीकरण संपवून मुंबईत परतलेल्या पूनमला गोवा फॉरवर्ड पार्टीनं चांगलाच दणका दिला आहे. पूनमनं गोव्यातील चपोली धरण परिसरात अश्लील व्हिडिओ चित्रीत केल्याप्रकरणी तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. 

आणखी एका व्यक्तीविरोधात Canacona पोलीस स्थानकातही अश्लील व्हिडिओ चित्रीत केल्याप्रकरणी एक एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला शाखेने पूनम पांडेविरोधात गोव्याकील पोलीस स्थानकांत तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

 

 
 
 
 

A post shared by Poonam Pandey Bombay (@ipoonampandey) on

एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली. काहीदिवसांपूर्वीच पतीविरोधात तक्रार केल्याप्रकरणी पूनम पांडे चर्चेत आली होती. पोलीस अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार धमकी, मारहाण आणि विनयभंग केल्याप्रकरणी तिच्या पतीला अटक करण्यात आली होती.