अभिनेत्री एली अवरामचा खुलासा म्हणाली, 'Goodbye' करण्याबाबत होती संभ्रमात

नुकताच प्रदर्शित झालेला 'गुडबाय' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. 

Updated: Oct 16, 2022, 11:52 PM IST
अभिनेत्री एली अवरामचा खुलासा म्हणाली, 'Goodbye' करण्याबाबत होती संभ्रमात title=

मुंबई : नुकताच प्रदर्शित झालेला 'गुडबाय' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. हा एक भावनिक कौटुंबिक चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, नीना गुप्ता, रश्मिका मंदान्ना यांच्यासह अनेक नामवंत कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

फिरंगी बहू डेझीच्या व्यक्तिरेखेमध्ये अभिनेत्री एली अवराम देखील लोकांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरली आहे. तिला मिळत असलेलं कौतुक आणि प्रतिसाद पाहून ती खूप उत्साहित आहे. मात्र, 'गुडबाय'ची स्क्रिप्ट वाचल्यानंतर ती हा चित्रपट करण्याबाबत खूप साशंक होती.

एलीने एका मुलाखतीत 'गुडबाय'बद्दल सांगितलं आहे. जेव्हा तिला हा चित्रपट ऑफर करण्यात आला तेव्हा तिचं यावर काय मत होतं, असा खुलासा तिने केला आहे. द फ्री प्रेस जर्नलशी झालेल्या संभाषणात एलीने आपलं मत सांगितलं आहे.

अमिताभसोबत काम करण्याची संधी मिळाली
मुलाखतीदरम्यान, एलीला विचारण्यात आलं की, जेव्हा तिला 'गुडबाय' ऑफर करण्यात आला तेव्हा तिला कसं वाटलं आणि त्यात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असल्याचं समजलं. यावर तिने उत्तर दिले, ''माझ्या कॅरेक्टर डेझीबद्दल मी दुहेरी मानसिकतेत होते. मात्र, अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायला कोणाला आवडणार नाही?

एली पुढे म्हणाली, "एक अभिनेत्री म्हणून मी नेहमीच आदरणीय पात्राच्या शोधात असते. माझी भूमिका परफॉर्मन्स ओरिएंटेड असावी असं मला नेहमीच वाटत होतं. मी या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं आणि दिग्दर्शक विकास बहलला ते खूप आवडलं."

एली अवरामने चित्रपटातील तिच्या पात्राबाबत ती का संभ्रमात होती हे देखील सांगितलं. तिच्या मते, डेझी ही परदेशी होती जिला भारतीय संस्कृतीबद्दल खूप आदर होता. पण एलीला हे पात्र खूप चांगलं समजून घ्यायचं होतं. ती म्हणाली, "माझ्या भारतावर मला खूप प्रेम आणि आदर आहे. यामुळेच देशातील कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावतील असं मी कधीही करणार नाही. मला काही मूर्खपणा करायचा नव्हता, पण विकासने खूप छान समजावून सांगितलं. त्यानंतर मी मान्य केले."