‘हा’ क्रिकेटर होता अनुष्का शेट्टीचं पहिलं प्रेम

आपल्या सौंदर्याने आणि अदाकारीने प्रेक्षकांना भुरळ घालणा-या अनुष्का शेट्टीने एक मोठा खुलासा केलाय. बाहुबलीमध्ये बाहुबलीची देवसेना बनून लोकांच्या मनावर राज्य करणा-या अनुष्काने तिच्या पहिल्या प्रेमाबद्दलचं गुपित उघड केलंय.

Updated: Nov 9, 2017, 04:01 PM IST
‘हा’ क्रिकेटर होता अनुष्का शेट्टीचं पहिलं प्रेम

मुंबई : आपल्या सौंदर्याने आणि अदाकारीने प्रेक्षकांना भुरळ घालणा-या अनुष्का शेट्टीने एक मोठा खुलासा केलाय. बाहुबलीमध्ये बाहुबलीची देवसेना बनून लोकांच्या मनावर राज्य करणा-या अनुष्काने तिच्या पहिल्या प्रेमाबद्दलचं गुपित उघड केलंय.

प्रभास आणि अनुष्काच्या अफेअरच्या अनेक चर्चा झाल्या, पण त्या दोघांनीही नेहमीच नाकारल्या आहेत. आता तर त्यांच्या साखरपुड्याचीही चर्चा रंगली आहे.

अनुष्का शेट्टीने नुकत्याच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत पहिल्या प्रेमाचा खुलासा केलाय. अनुष्काने तिचं पहिलं प्रेम टीम इंडियाचा माजी खेळाडू ‘द वॉल’ म्हणून लोकप्रिय असलेला राहुल द्रविड असल्याचे सांगितले. 'माझं पहिलं प्रेम राहुल द्रविड हेच होतं,' असा गौप्यस्फोट तिनं केला आहे.

'राहुल द्रविड हा माझा सर्वात आवडता क्रिकेटर आहे. एकेकाळी राहुल माझा क्रश होता. तो मला खूप आवडायचा. एका टप्प्यावर तर मी त्याच्या प्रेमात पडले होते,' असं अनुष्का एका तामीळ पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

राहुल द्रविड याची इमेज तेव्हाही आणि आजही जंटलमनची होती. द्रविडबद्दल नेहमीच बोललं जातं की, तो डोळ्याने जास्त बोलतो. तो फारच लाजाळू मानला जातो. पण त्याच्या हृदयावर नागपूरच्या डॉ. विजेता पेंढारकरने विजय मिळवला. २००४ मध्ये त्याने विजेतासोबत लग्न केलं. दोघांचं लव्ह कम अरेंज मॅरेज आहे. दोघेही ऎकमेकांना आधीपासून ओळखत होते. विजेताचे वडील एअरफोर्समध्ये होते. विजेता एकुलती एक मुलगी होती. राहुल आणि विजेता यांचा आज सुखाचा संसार सुरू आहे. विजेताबाबत एक सांगितलं जातं की, तिने क्रिकेटरसोबत लग्न केलं पण तिला क्रिकेटची एबीसीडीही येत नाही. ती बंगळुरूमध्ये सर्जन आहे. दोघांना समित आणि अनवे ही दोन मुलेही आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x