तुझं लग्न झालंय, बाळही झालंय... आता ते शक्य नाही; अभिनेत्रीसमोर 'तो' कठीण प्रसंग

एक विवाहित महिला आणि एका बाळाची आई असल्यामुळं तिला नकार पचवावा लागला. 

Updated: Feb 7, 2022, 12:26 PM IST
तुझं लग्न झालंय, बाळही झालंय... आता ते शक्य नाही; अभिनेत्रीसमोर 'तो' कठीण प्रसंग  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : असं म्हणतात की अभिनेत्री होणं फारसं सोपं नसतं. म्हणजे समोरून एखाद्या अभिनेत्रीच्या आयुष्याबाबत कितीही हेवा वाटत असला तरीही त्या अपवादाला शह देणारेही काही प्रसंग असतात. अशाच प्रसंगांचा एकता अभिनेत्रीला सामना करावा लागला होता. 

हा प्रसंग होता लग्न आणि मातृत्तामुळं अभिनेत्रीला काम नाकारलं जाण्याचा. 

'कसौटी', 'कुमकुम', 'काव्यांजली', 'करम अपना अपना' अशा मालिकांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणारी अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif ) हिनं या साऱ्याचा सामना केला. 

मालिकांदरम्यान अमालानं काहीशी विश्रांती घेतली. यादरम्यान तिनं लग्न केलं. पुढे चित्रपटांच्या दरम्यान मला कोणी मार्गदर्शन करणारं नव्हतं असं अमालानं सांगितलं. 

'एक व्हिलन' या चित्रपटानंतर तिला काही चित्रपटांसाठी विचारणा झाली. पण, नंतर तिला बाळ झालं होतं. अनेकांनीच तिला म्हटलं, आता तुझी कारकिर्द संपलीये. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hungama Play (@hungama_play)

एक विवाहित महिला आणि एका बाळाची आई असल्यामुळं तिला नकार पचवावा लागला. पण, आपल्याला स्वत:ला सिद्ध करावंच लागेल या जिद्दीनं ती पेटून उठली. 

अमाला शरीफनं या सर्व आव्हानांना तोंड देत ती या टप्प्यावर पोहोचली. सध्या आगामी 'डॅमेज्ड 3' या सीरिजमुळे ती चर्चेत आली आहे.