Ranbir Kapoor and Alia Bhatt: रणबीर कपूरने अभिनेत्री आलिया भट्टसोबत यावर्षी (Alia and Ranbir Marriage) एप्रिलमध्ये लग्न केले. लग्नाच्या सुमारे दोन महिन्यांनंतर आलियाने आपल्या प्रेग्नंन्सीची (Alia Bhatt Pregnancy) घोषणा केली. आलिया आणि रणबीर गेल्या काही महिन्यांपासून आपला ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रमोट करण्यात बिझी होते. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान रणबीर आणि आलिया एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत होते परंतु त्यातही असे अनेक क्षण टिपले गेले आहेत ज्यात रणबीर आलियाकडे दुर्लक्ष करताना दिसला. प्रेग्नंट आलियासोबत रणबीर वागणे फारच उद्धट आहे असेही अनेकांना वाटले. (actor ranbir kapoor who was trolled for his rude behaviour with alia bhatt now getting cozy with her see photos)
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचे प्रमोशन करत होते त्यादरम्यान असे क्षण टिपले गेले ज्यात रणबीर आलियाला चांगली वागणूक देत नव्हता. एकदा आलिया रणबीरचे केस नीट करण्याचा प्रयत्न करत असताना त्याने आलियाचा हात भिरकावा म्हणून आपले डोके मागे वळवले आणि आलियाला स्वतःपासून दूर ढकलले. असेही झाले जेव्हा रणबीर आलियाला सोडून चक्क एकटा निघून गेला होता.
आलिया भट्टने नुकताच एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिचा पती रणबीर कपूरसोबत कोझी होताना दिसत आहे. आलियाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये रणबीर आलियाच्या नाकावर किस करत आहे. आलिया हसत आहे आणि दोघांनीही डोळे मिटले आहेत. हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो असून आलियाने 'होम' असे कॅप्शन दिले आहे. या फोटोवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
आलिया आणि रणबीरचा ब्रह्मास्त्र बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे आहे आणि दोन आठवड्यांपासून ब्रह्मास्त्र हा चित्रपट सुरू आहे.