मुंबई : मुंबईत काही ठिकाणं अशी आहेत जिथं प्रेमी युगुलं अनेकदा निवांत क्षण व्यतीत करताना दिसतात. बम्बईया भाषेत म्हणावं तर, ही ठिकाणं म्हणजे 'कपल अड्डा'. असंच एक ठिकाण म्हणजे बँड्रा बँण्डस्टॅण्ड आणि कार्टर रोड.
मुंबईतील काही खास हँगआऊट ठिकाणांपैकी ही दोन नावं. इथं बऱ्याच प्रेमी युगूलांनाही पाहिलं जातं.
एक अतिशय लोकप्रिय अभिनेताही इथं त्याच्या तेव्हाच्या प्रेयसी (आताची पत्नी)सोबत बराच काळ व्यतीत करत होता.
इथं तिच्याशी जवळीत साधत असताना त्याला पोलिसांनी हटकलंही आहे. खुद्द एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा करणारा हा अभिनेता आहे, आर. माधवन.
'ज्यावेळी मी सरितासोबत फिरत होतो, तेव्हा माझ्याकडे एक जागा होती, जवळीक साधण्यासाठी. त्यामुळं हे दगड (समुद्रकिनारी असणारे) आमच्यासाठी बऱ्याच कहाण्या सांगणारे आहेत', असं माधवन म्हणाला.
इतर सर्वच मुंबईकर कपल्सप्रमाणेच आमची सुरुवात झाली होती. डबल डेकर बसमधून फिरणं, दगडांच्या मागे रोमॅन्स करणं, तिथे मग पोलीस येत घरी जा म्हणून आम्हाला दरडावणं हे सारं अनुभवलं आहे, हे त्यानं प्रकाशझोतात आणलं.
सर्वसामान्य जोडप्यांप्रमाणेच आपल्या नात्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये माधवनही अनेक असे अनुभव घेऊन झाला, ज्या निमित्तानं त्यानं वेगळी मुंबई पाहिली.
1999 मध्ये जवळपास 8 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यानं सरिता बिरजे हिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
चित्रपट वर्तुळात हे नातं आणि हा विवाहसोहळा सर्वांचं लक्ष वेधणारा ठरला होता.