प्रकाश राज दुखापतग्रस्त; शस्त्रक्रियेसाठी 'या' ठिकाणी स्थलांतरित

प्रकाश राज यांना तातडीनं हलवलं 'या' ठिकाणी 

Updated: Aug 10, 2021, 07:30 PM IST
प्रकाश राज दुखापतग्रस्त; शस्त्रक्रियेसाठी 'या' ठिकाणी स्थलांतरित title=
प्रकाश राज

मुंबई : अभिनयाच्या बळावर चित्रपट जगतात दबदबा निर्माण करणाऱ्या प्रकाश राज यांना दुखापत झाल्याचं कळत आहे. खुद्द राज यांनीच ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. हल्लीच्याच दिवसांमध्ये आपल्याला दुखापत झाल्याचं त्यांनी या ट्विटमधून सांगितलं. 

दुखापतीबाबत माहिती देत त्यांनी आपल्याला लहानसं फ्रॅक्चर झाल्याचं सांगितलं. ज्यामुळं सर्जरीसाठी आपण हैदराबादला जाणार असल्याचंही त्यांनी ट्विटमधून चाहत्यांना सांगितलं. 

'एक लहानशी दुखापत आहे. डॉक्टर गुरुवरेड्डी यांच्या सुरक्षित हाती मी सर्जरीसाठी स्वत:ला सोपवतोय. मी बरा होईन, काही चिंता करण्याचं कारण नाही.... मला तुमच्या विचारांत कायम ठेवा', असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं. 

आपल्या असंख्य चाहत्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करा, मी लवकर बरा होवो यासाठी प्रार्थना करा अशी विनंती त्यांनी चाहत्यांना केली आहे. हिंदी चित्रपटांमध्येही प्रकाश राज यांच्या नावाला वजन प्राप्त आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सुपरहिट असणारा हा चेहरा हिंदी चित्रपटांमध्येही विशेष लोकप्रिय आहे. 

आतापर्यंत त्यांनी 'वॉण्टेड', 'सिंघम',  Ghilli, Wanted, Anniyan, आणि Pokiri या चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. Movie Artistes Association (MAA) या संघटनेसाठी सध्या ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहभागी होत आहेत. हैदराबादमध्येच ही निवडणूक पार पडणार आहे.