'बडे-बडे बाता..’ इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर, 200 जणांनीही मत दिलं नाही!

Ejaz Khan Lost in Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोवर्स तरी एजाज खानला 200 पेक्षा कमी मत

दिक्षा पाटील | Updated: Nov 23, 2024, 04:55 PM IST
'बडे-बडे बाता..’ इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर, 200 जणांनीही मत दिलं नाही! title=
(Photo Credit : Social Media)

Ejaz Khan Lost in Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीचा निकाल समोर आला आहे. महायुती सरकारनं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आहे. मात्र, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील काही जागी आश्चर्य होतील असे निकाल आल्याचे पाहायला मिळाले आहेत. सोशल मीडियावर अशा सगळ्या निकालांची चर्चा सुरु आहे. यात एक सेलिब्रिटी आहे ज्याची चर्चा सुरु आहे आणि तो म्हणजे अभिनेता एजाज खान. एजाज खाननं देखील 2024 च्या विधानसभा निवडणूकीत त्याचं नशिब आजमावलं आहे. पण त्याला यावेळी त्याच्या चाहत्यांची साथ मिळालेली नाही. 
 
एजाज खान मुंबईतील वर्सोवा इथून विधानसभा निवडणूक लढत होता. एजाज खानला चंद्रशेखर यांची मतदारसंघ आजाद समाजकडून निवडणूक लढत होता. त्यानंतर एजाज खानसाठी स्वत: चंद्रशेखर यांनी देखील मुंबईत येऊन प्रचार केला. आज सकाळपासून एजाज खानला किती मतं मिळाली याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अखेर 22 राऊंडनंतर एजाज खानला तब्बल 155 च्या आसपास मत मिळाली. 

दरम्यान, एजाज खानला मिळालेल्या मतांची बातमी समोर येताच सोशल मीडियावर नेटकरी त्यांची खिल्ली उडवू लागले आहेत. त्याच्यावरून अनेक मीम्स हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका मीमनं एजाजला 'त्याच्या कुटुंबानं देखील मत दिलं नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'अखेर कोण आहेत ज्यांनी एजाजला मत दिलं. त्यावर तपास केलाच पाहिजे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'एजाज, रील लाइफ हे रियल लाइफ नसतं. एजाजचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोवर्स आहेत. तरी देखील त्याला इन्स्टाग्रामवर 200 पेक्षा कमी मत मिळाली आहेत.' आणखी एक नेटकरी म्हणाला की 'सोशल मीडियावर हा हीरो बनवतो पण खऱ्या आयुष्यात तो काय आहे हे सत्य आज त्याच्या समोर आलं आहे.'

हेही वाचा : ...अन् या हिंदी गाण्यामुळे रॉ एजेंटचा वाचला जीव; सोनू निगमच्या वडिलांनी गायलं होतं 'ते' गाणं

2024 मध्ये लोकसभा निवडणूकीत आजमावलं नशिब

एजाज खाननं मे 2024 मध्ये लोकसभा निवडणूकीत देखील स्वत: चं नशिब आजमावलं होतं. उत्तर मध्ये मुंबई सीटच्या निर्दलीय निवडणूक लढली होती. आता वर्सोवा सीटवरून त्यानं पुन्हा निवडणूक लढली आहे. एजाज खान हा 65 हजार पेक्षा जास्त मतांनी हरला आहे.