मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मालिका विश्वात प्रेक्षकांच्या मनाता सातत्याने ठाव घेणारी 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. छत्रपती शिवरायांनी पाया रचलेल्या स्वराज्याचं रक्षण करत, स्वराज्याच्या कक्षा आणखी रुंदावू पाहणाऱ्या छत्रपती संभाजी राजे यांच्या शौर्यगाथेवर या मालिकेतून प्रकाझोत टाकण्यात आला.
डॉ. अमोल कोल्हे यांनी आपली राजकिय कारकीर्द सांभाळतच या मालिकेतील मुख्य भूमिका साकारण्याला सार्थ न्याय दिला. छत्रपती संभाजी राजांची व्यक्तीरेखा कोल्हे यांनी जीवंत केली. अशा या मालिकेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे.
स्वराज्यातीलच काही चेहऱ्यांच्या फितुरीमुळे दुर्दैवाने स्वराज्याचं दार ठोठावलं आणि संभाजी महाराज गनिमांच्या हाती गावले. मालिकेत सध्या याच प्रसंगांवर भाष्य करण्यात येत आहे. ज्यासंबंधीचा एक व्हिडिओ पाहताना छत्रपती संभाजी राजे प्रत्यक्षात होते तरी कसे याचा सहज अंदाज लावता येत आहे.
मुघल शासक औरंगजेब जेव्हा साखळदंडामध्ये बांधलेल्या संभाजीराजेंना पाहतो तेव्हा त्य़ाच्यातील उद्दाम शासक जागा होतो आणि राजेंचा एकेरी उल्लेख करतो. तेव्हा औरंगजेबाला नजरेतूनच रागे भरत 'संभाजी नाही... छत्रपती संभाजी राजे म्हणायचं...', असं संभाजी राजेंनी ठणकावून सांगितलं, तेव्हा अपमान झाल्याची भावना त्याच्या नजरेत सहज पाहायला मिळत आहे.
औरंगजेबाच्या उद्दामपणावर संभाजीराजांनी जी डरकाळी फोटली ती पाहून क्षणार्धासाठी त्या मुघल शासकाच्या पायाखालची जमीनही सरकली. भीतीची भावना त्याच्या डोळ्यांत सहज पाहता आली. तर, एका छत्रपतींना दिली जाणारी ही वागणूक पाहता संभाजीराजेंच्या संतापाने परिसीमा गाठल्याचंही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मालिकेच्या भागातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने या व्हिडिओला लाईक आणि शेअर केलं असून, छत्रपती संभाजी महाराजांविषयी आपली आदराची भावना व्यक्त केली.