धर्मेंद्र यांच्यासोबत कोण आहे ही मुलगी

 हा व्हिडिओ लोकांना इतका भावला आहे की...

Updated: Jan 18, 2019, 02:11 PM IST
धर्मेंद्र यांच्यासोबत कोण आहे ही मुलगी title=

मुंबई : बॉलिवूडचे हिमॅन धर्मेंद्र सध्या आपला वेळ अतिशय शांततेत फार्म हाऊसवर घालवत आहे. फार्म हाऊसवरून निसर्गाच्या सानिध्यातील व्हिडिओ शेअर करताना दिसतात. असं असताना आता धर्मेंद्र यांनी एका लहान मुलीसोबत व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ लोकांना इतका भावला आहे की, नेटीझन्सनी त्याला चांगलीच पसंती दिली आहे. 
धर्मेंद्रच्या सर्व चाहत्यांना माहित आहे की, ते सध्या मुंबईपासून दूर राहत असून आपला बराचसा वेळ फार्म हाऊसवर घालवत असतात. धर्मेंद्र या फार्म हाऊसवर निसर्गासोबत वेळ घालवताना दिसतात. तसेच धर्मेंद्र अनेकदा आपल्या शेतातील ऑर्गेनिक भाज्यांची माहिती देणारा व्हिडिओ शेअर करताना दिसतात. आता त्यांनी या गोंडस मुलीसोबत व्हिडिओ शेअर केला आहे. 

या व्हिडिओ धर्मेंद्र खूप गोंडस मुलीसोबत दिस आहे. या व्हिडिओत हे दोघं खूप छान बोलताना दिसत आहेत. धर्मेंद्र यांनी 'डार्क गिल्टरिंग डॉल' असं नाव या मुलीला दिलं आहे. मात्र या व्हिडिओ धर्मेंद्र यांनी एक प्रश्न देखील विचारला आहे की, सांगा ही गोंडस मुलगी कोणत्या देशातून आली आहे? या व्हिडिओसोबत त्यांनी एक मॅसेज देखील दिला आहे. अदिती, माझ्या कूकची मुलगी आहे. जी माझ्यासाठी एका मुलाप्रमाणेच आहे. ही मुलगी माझ्याच फार्मवर जन्मली आणि इथेच मोठी झाली आहे. या मुलीची कंपनी खूप चांगली आहे. ही मुलगी शाळेत शिकत असून तीच्या शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा आहे. त्यामुळे तिला शुभेच्छांची गरज आहे. आपल्या सगळ्यांना माहितच आहे, धर्मेंद्र हे उत्तम अभिनेत्याबरोबरच एक उत्तम माणूस देखील आहेत. ही मुलगी त्यांच्यासोबत खूप छान राहते. तिला ते तिचे खरे आजोबा वाटतात. आणि हेच धर्मेंद्र यांच वेगळेपण आहे.