बक्कळ पैसा, प्रसिद्धी असतानाही वडिलांनी... एकट्या आईनं सांभाळलं म्हणत अर्जुन भावूक

अर्जुन कपूर सांगतो की, त्याच्या आयुष्यात एक खूप चांगली गोष्ट घडली की...

Updated: May 18, 2022, 12:32 PM IST
बक्कळ पैसा, प्रसिद्धी असतानाही वडिलांनी... एकट्या आईनं सांभाळलं म्हणत अर्जुन भावूक title=

मुंबईः बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला बॉलिवूडमध्ये एक दशक पूर्ण झालं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन कपूरने सांगितले की, त्याच्या आयुष्यात एक खूप चांगली गोष्ट घडली की, तो आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून नाही. अर्जुन सांगतो, आजपर्यंत वडील बोनी कपूर यांच्याकडून त्याने काहीही घेतलेले नाही. अभिनेता होण्याआधीही तो वडिलांची खूप गरज असेल तेव्हाच मदत घ्यायचा. 

दिवंगत आई मोना कपूरचे कौतुक करताना अर्जुन कपूर म्हणाला की, आईने बहीण आणि त्याचं संगोपन खूप चांगले केलं. आई आज असती आणि तिने माझे चित्रपट पाहिले असते तर तिला नक्कीच कौतुक वाटलं असतं आणि मी काहीतरी चांगलं करतोय याचा तिला अभिमान वाटला असता.

अर्जुन कपूरची आई मोना टीव्ही मालिकांची प्रोड्यूसर होती. 2012 मध्ये त्यांचं निधन झालं. उच्च रक्तदाब आणि कर्करोगासह त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. अर्जुन कपूरने आईच्या निधनानंतर दोन महिन्यांनी अर्जुनने 'इशकजादे' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 

अर्जुन कपूरने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभवही शेअर केले, 2018 मध्ये श्रीदेवीचे निधन झाले तेव्हा तिला दोन बहिणी मिळाल्या. जान्हवी आणि खूशी कपूर या अर्जुनच्या खूप जवळ आहेत. वडील बोनी कपूर हे देखील त्याच्या आणि बहीण अंशुला कपूरच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. 

अर्जुन म्हणाला की, ज्याप्रमाणे त्याच्या कुटुंबाला सार्वजनिक जीवनात जज केलं जातं, तसं कोणासोबतही होऊ नये. अर्जुन कपूरला आपल्या आईचा प्रचंड अभिमान वाटतो कारण, आईला आपल्याला प्रचंड मजबूत बनवलं आणि टीकाकारांशी लढायलाही शिकवलं. त्यामुळे परिवारापेक्षा आपल्यासाठी कोणी मोठं नाही असं अर्जुन सांगतो.