डॉ. मनमोहन सिंंगच्या भूमिकेत अनुपम खेर, फर्स्ट लूक रसिकांंच्या भेटीला

2004 ते 2014 या दहा वर्षात डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताचं प्रतिनिधित्त्व केले. मितभाषी असणार्‍या मनमोहन सिंग यांच्या आयुष्याचा जीवनपट आता लवकरच रूपेरी पडद्यावर अवतरणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक पहिल्यांदा चाहत्यांसमोर येणार आहे. 

Updated: Apr 6, 2018, 08:26 AM IST
डॉ. मनमोहन सिंंगच्या भूमिकेत अनुपम खेर, फर्स्ट लूक रसिकांंच्या भेटीला  title=

मुंबई : 2004 ते 2014 या दहा वर्षात डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताचं प्रतिनिधित्त्व केले. मितभाषी असणार्‍या मनमोहन सिंग यांच्या आयुष्याचा जीवनपट आता लवकरच रूपेरी पडद्यावर अवतरणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक पहिल्यांदा चाहत्यांसमोर येणार आहे. 

द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर   

द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या आगामी चित्रपटात डॉ. मनमोहन सिंग यांची प्रमुख भूमिका अनुपम खेर साकारणार आहेत. ट्विटर हॅन्डलच्या माध्यमातून त्यांनी  या चित्रपटातील त्यांचा लूक शेअर केला आहे. अनुपम खेर हे हुबेहुब डॉ. मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे दिसत आहे. 

 

 

लंडनमध्ये शूटिंग  

द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. बोहरा ब्रदर्स निर्मित आणि विजय रत्नाकर दिग्दर्शित या चित्रपटाबाबत खूप उत्सुकता होती. अखेर या चित्रपटाची पहिली झलक  चाह्त्यांसमोर आली आहे. हा चित्रपट संजय बारूंच्या पुस्तकावर आधारित आहे.  

डॉ. मनमोहन सिंग  

डॉ. मनमोहन सिंग हे अर्थशास्त्रज्ञ, राजकीय व्यक्ती आणि भारताचे माजी पंताप्रधान आहेत. लंडनमधून त्यांनी अर्थशास्त्रामध्ये उच्च शिक्षण घेतले. डॉ. सिंग मितभाषी असल्याने त्यांच्यावर अनेकदा टीकादेखील झाली. यूपीए सरकारच्या काळात डॉ. सिंग दहा वर्ष पंतप्रधान होते.