... आणि भांगात सिंदूर लावलेल्या रेखा यांना पाहून जया बच्चन यांनी उचललं मोठं पाऊल

 लग्नात या दोघींवरच खिळलेल्या नजरा  

Updated: Aug 10, 2021, 05:02 PM IST
... आणि भांगात सिंदूर लावलेल्या रेखा यांना पाहून जया बच्चन यांनी उचललं मोठं पाऊल  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : प्रेमाच्या आणाभाका घेतल्यानंतर येणारी वादळं आणि प्रसंगी उभे ठाकणारे अशक्य प्रसंगही थोडेथोडकेच वाटू लागतात. 'एक आग का दर्या है और तैर के जाना हे', ही ओळ संघर्षमय प्रेमाच्या नात्यांसाठी अतिशय समर्पक आहे. हिंदी चित्रपट दुनियेनं आजवर अशी अनेक नाती पाहिती आहेत. 

काही नात्यांचा शेवट गोड होता, तर काहींचा शेवट हा नियतीला मंजुर होता तसा. अशा या नातांच्या गोतावळ्यात चाहत्यांचं सातत्यानं लक्ष वेधणारं नातं म्हणजे महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) आणि अभिनेत्री रेखा (rekha)यांचं. खरंतर त्यांच्या या नात्याचा त्रिकोण म्हणावा लागेल, कारण बिग बींनी अभिनेत्री जया बच्चन यांच्याशी विवाहबंधनात अडकत नव्या नात्याची सुरुवात केली असतानाही त्यांचं नाव रेखा यांच्याशी जोडलं गेल्याचं म्हटलं जात होतं. 

रेखा यांचा दबदबा आजही कायम, 1 मिनिटांच्या प्रोमोसाठी फी घेण्यांच्या बाबतीत नवख्या अभिनेत्रींना टाकलं मागे

 

रेखा आणि बच्चन यांच्या रिलेशनशिपची (Relationship) चर्चा होतच होती, पण एक असाही प्रसंग ओढवला जेव्हा जया बच्चन बेचैन झाल्या होत्या. 'रेखा: द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकामध्ये यासिर उस्मान यांनी एका प्रसंगाचा उल्लेख केला आहे, जिथं 1980 मध्ये ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या विवाहसोहळ्यात रेखा थेट भांगात कुंकू (सिंदूर) भरुन पोहोचल्या होत्या. त्यांच्यावरच उपस्थितांच्या नजरा खिळल्या होत्या. 

असं म्हटलं जातं की, जया बच्चन यांनी त्यावेळी खूप प्रयत्नांनी स्वत:वर ताबा ठेवला होता. पण, अखेर त्यांचा ताबा सुटला आणि त्यांनी अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. या प्रसंगानंतर जेव्हा केव्हा रेखा यांना सिंदूर लावण्यामागचं कारण विचारलं होतं, तेव्हा त्यांनी आपण चित्रीकरणाहून थेट तिथे पोहोचलो होतो आणि मला लोकांच्या प्रतिक्रियांची चिंता नाही, असं कारण त्यांनी पुढे केलं होतं. आजही त्यांनी सिंदूर का लावला होता, हा प्रश्न अनेकदा पुढे येतो आणि निरुत्तर राहूनच विस्मरणातही जातो.