गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात अभिनेत्रीची योगसाधना; जोडीदारानं अशी दिली साथ, पाहा Video

Aashka Goradia :अभिनेत्री आशका गोराडिया गर्भवती असून ती लग्नाच्या 6 वर्षांनंतर आई बनणार आहे. आज जागतिक योग दिनानिमित्त तिने गरोदरपणातील योगा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.  

श्वेता चव्हाण | Updated: Jun 21, 2023, 02:55 PM IST
गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात अभिनेत्रीची योगसाधना; जोडीदारानं अशी दिली साथ, पाहा Video  title=
Aashka Goradia

Aashka Goradia prenatal yoga moves : सध्या बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री या आपल्या घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या चाहुलीने उत्सुक झाल्या आहेत. लगी तुझसे लगन, डायन, कुसुम आणि नागिन यांसारख्या हिट शोमध्ये दिसलेल्या आशका गोराडिया (Aashka Goradia) लवकरच आई होणार आहे. अलिकडेच तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. याचदरम्यान आज जागतिक योग दिनानिमित्त आशक गोराडियाने गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात पतीसोबत योगसाधना करत इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेत्री आशका गोराडिया आणि ब्रेंट ग्लोब यांनी 1 डिसेंबर 2017 रोजी लग्न केले. आता लग्नाच्या 6 वर्षानंतर हे जोडपे आई-वडिल होणार आहेत. अभिनेत्री नोव्हेंबर 2023 मध्ये तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे, त्यामुळे ती खूप आनंदी आहे. पाच महिन्याची गरोदर असणारी आशका गोराडिया तिच्या गर्भधारणेच्या काळातही निरोगी राहण्यासाठी तिचे वर्कआउट सत्र सुरूच ठेवले आहे. आज जगभरात योग दिवस साजरा होत असताना आशकाने इन्स्टाग्रामवर गरोदरपणात योगा करतानाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. यासोबतच अभिनेत्रीने तिच्या 18 आठवड्यांच्या गरोदरपणाबद्दलही सांगितले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

आशका गोराडिया ही 5 महिन्यांची गरोदर आहे आणि या काळातही ती जोमाने योगा करत आहे. तिच्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये ती प्रसवपूर्व योगा करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या काळात तिचा नवरा आणि गोव्यातील ट्रेंड योग प्रशिक्षक ब्रेंट गोबल तिला पूर्ण पाठिंबा देतात. तुम्ही हा व्हीडीओ पाहिला तर आशका गोराडिया ही योगाभ्यास करताना फॉरवर्ड बेंड, पुश अप्स आणि बरेच काही करताना दिसत आहे. 

आशका आणि ब्रेंटच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचे तर दोघेही पहिल्या नजरेतच एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघे वेगासमध्ये भेटले आणि आशकाच्या सहलीच्या शेवटच्या दिवशी तिला कळले की तिचे आयुष्य कायमचे बदलले आहे. मग ते भेटले आणि ब्रेंटने आशकाशी संपर्क साधला. जरी, सुरुवातीला आशका इतकी सिरिअस नव्हती, पण नंतर तिला तिच्या भावना समजल्या आणि तिने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. 

आशका गेल्या काही काळापासून अभिनयापासून दूर आहे. सध्या ती आपल्या कॉस्मेटिक बिझनेसवर फोकस करत आहे. दरम्यान आशका सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी कनेक्टेड राहते. आपले फोटो ती नेहमी शेअर करत असते.