आशिक बनाया अापने गाण्यावरील या मुलीचा डान्स व्हिडिओ व्हायरल...

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रोतेला आणि करण वाहीच्या हेट स्टोरी 4 चे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 19, 2018, 08:31 AM IST
आशिक बनाया अापने गाण्यावरील या मुलीचा डान्स व्हिडिओ व्हायरल... title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रोतेला आणि करण वाहीच्या हेट स्टोरी 4 चे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. अलिकडेच त्याचे पहिले गाणे आशिक बनाया आपने देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. हिमेश रेशमियाच्या आवाजातील हे गाणे चांगलेच लोकप्रिय झाले होते. आता या सिनेमातून हे गाणे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नेहा कक्‍कडीच्या आवाजातील या गाण्यावर उर्वशी रोतेलाचा हॉट अंदाज पाहायला मिळणार आहे. २००५ मध्ये आलेल्या आशिक बनाया आपने सिनेमातील हे गाणे लोकप्रिय ठरले होते. या सिनेमात इमरान हाश्मी आणि तनुश्री दत्ता यांचा हॉट अंदाज पाहायला मिळाला होता.

व्हिडिओ व्हायरल होत आहे

आता या गाण्यावर डान्स करतानाचा एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा तरूणाईला चांगलाच भावला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले टॅलेंट दाखवण्याचे उत्तम साधन तरुणाईला सापडला आहे, असे म्हणायला हरकत नाही. 

९ लाखांहुन अधिक लोकांनी पाहिला व्हि़डिओ

LiveToDance with Sonali नावाच्या एका युट्युब चॅनलने हा व्हिडिओ अपलोड केला आहे. या मुलीचा डान्स जबरदस्त आहे. ५ फेब्रुवारीला अपलोड केलेला हा व्हिडिओ १३ दिवसात ९७५,१८२ लोकांनी पाहिला आहे. 'हेट स्टोरी 4' च्या या गाण्याला चांगलीच रंगत आली आहे. हेट स्टोरी सीरीजमधील हा चौथा सिनेमा असून आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हा सिनेमा ९ मार्चला प्रदर्शित होईल.