आजीला सोडताना भावुक झाली आराध्या, व्हिडिओ व्हायरल

ऐश्वर्या आणि अभिषेक यांची कन्या आराध्या बच्चन सोशल मीडियावर फेव्हरिट स्टार आहे. 

Updated: May 23, 2018, 06:05 PM IST
आजीला सोडताना भावुक झाली आराध्या, व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : ऐश्वर्या आणि अभिषेक यांची कन्या आराध्या बच्चन सोशल मीडियावर फेव्हरिट स्टार आहे. इंटरनेटवर सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. मंगळवारी रात्री ऐश्वर्या राय मुलगी आराध्या आणि आई वृदांसह डिनरवर गेली होती. यादरम्यान तिघेही कॅमेऱ्यात कैद झाले. रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर जेव्हा तिघीही बाहेर निघाल्या तेव्हा आराध्या भावुक झालेली दिसली. तिने आजीला गुड बाय केल्याशिवाय जाऊ दिले नाही. आजी आणि नातीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हिडीओत आराध्या आजीला सोडायला जाताना भावुक झाली. 

 

LAST NIGHT - @aishwaryaraibachchan_arb With #AaradhyaBachchan and #VrindaRai Spotted At #Yautacha Restaurant at Mumbai . . . #AishwaryaPlanet #AishwaryaRaiBachchan #AaradhyaBachchan #VrindaRai Video Courtesy - #Bollyspy

A post shared by αíshwαrчα plαnєt (@aishwaryaplanet) on

 

हा व्हिडीओ पाहिल्यावर असे वाटते की आराध्याला तिच्या आजीसोबत आणखी काही वेळ घालवायचा आहे. आजीने सोडून जाऊ नये असे आराध्याला वाटतेय. त्यामुळेच ती आजीला नको जाऊ असे सांगतेय.