आराध्या बच्चन फोटोग्राफर्सवर भडकली; स्टारकिडचा असा अवतार पाहून चाहते आश्चर्यचकित

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन बी-टाऊनच्या लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. 

Updated: Jul 22, 2022, 04:21 PM IST
आराध्या बच्चन फोटोग्राफर्सवर भडकली; स्टारकिडचा असा अवतार पाहून चाहते आश्चर्यचकित title=

मुंबई : माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन बी-टाऊनच्या लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. आराध्या अजूनही खूप लहान आहे. मात्र तिची आतापासूनच जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. आराध्या गेल्या काही काळापासून तिच्या वाढत्या उंचीमुळे चर्चेत आहे. आता आम्ही तुमच्यासाठी या स्टार किडचा थ्रोबॅक व्हिडिओ घेऊन आलो आहोत. या व्हिडिओमध्ये आराध्याचे एक्सप्रेशन सर्वांची मनं जिंकत आहेत. व्हिडिओमध्ये आराध्याच्या चेहऱ्यावर थोडासा राग दिसत आहे.

आराध्याचा थ्रोबॅक व्हिडिओ
ऐश्वर्या नेहमी तिच्या मुलीचा हात धरून तिच्यासोबत इव्हेंटमध्ये पोहोचते. कान्स फिल्म फेस्टिव्हल असो की कुठलीही स्टार पार्टी सर्वत्र ऐश्वर्या आणि आराध्या हातात हात धरुन जाताना दिसतात. या थ्रोबॅक व्हिडिओबद्दल बोलताना, आराध्या एका स्टारच्या लग्नात सहभागी होण्यासाठी ऐश्वर्या आणि अभिषेकसोबत पोहोचली होती. अशा परिस्थितीत आराध्या पापाराझींवर थोडी नाराज दिसली.

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, सामान्य सेलिब्रिटींप्रमाणे आराध्या उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे सगळ्या कॅमेऱ्यांना पोज देते आणि जेव्हा ती पोझ देऊन थकते तेव्हा ती रागाने डोळे वर करते. आराध्याचा हा खूप जुना व्हिडिओ आहे. मात्र, हा पाहिल्यानंतर ऐश्वर्या लहानपणापासूनच आराध्याला पापाराझींना सामोरे जायला शिकवत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अलीकडेच कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून ऐश्वर्या आणि अभिषेकसोबत आराध्याचे काही फोटो समोर आले होते. हे फोटो समोर आल्यानंतर आराध्या बच्चनच्या उंचीची सर्वाधिक चर्चा होत आहे. खरंतर या फोटोंमध्ये आराध्या खूप मोठी दिसत आहे. उंचीमध्ये आराध्या तिच्या आईच्या कानापेक्षा उंच दिसत आहे.