आमिर आणि किरण राव 'लाल सिंह चड्ढा'च्या सेटवर दिसले डान्स करताना, पाहा व्हिडिओ

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान आजकाल आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

Updated: Jul 15, 2021, 06:48 PM IST
आमिर आणि किरण राव 'लाल सिंह चड्ढा'च्या सेटवर दिसले डान्स करताना, पाहा व्हिडिओ title=

मुंबई : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान आजकाल आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून 'लाल सिंह चढ्ढा' या सिनेमाचं शूटिंग लद्दाखमध्ये वाखा गावात सुरू आहे. या दरम्यान आमिर खान आपली एक्स पत्नी किरण रावसोबत डान्स करताना दिसला आहे. आमिर आणि किरण येथे पारंपारिक लडाखी कपड्यांमध्ये दिसले आणि त्यांनी परिधान केलेल्या ड्रेसमध्ये तिथल्या लोकांसोबत पारंपारिक नृत्यही केलं.

आमिर-किरण एकत्र नाचताना दिसले
आमिर खान आणि किरण राव यांनी नुकतीच घटस्फोटाची घोषणा केली. मात्र आता या दोघांचा एकत्र डान्स करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात आमिर आणि किरण लाल रंगाच्या लडाखी ड्रेसमध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर या दोघांनी डोक्यावर पारंपरिक टोपी घातली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गावकऱ्यांनी आमिर खानला दिली रिसेप्शन पार्टी 
वाखा गावच्या लोकांनी आमिर आणि त्याच्या संपूर्ण टीमसाठी रिसेप्शन पार्टी आयोजीत केली होती. आपल्या गावात '3 इडियट स्टार' आमिरला पाहून गावकरी खूप आनंदित झाले होते. आमिरनेही या सगळ्यांचे आभार मानले. याचबरोबर तो लहान मुलांसोबत खूप नाचतानाही दिसला.

कचरा फेकण्यावरुन झाला होता वाद 
काही दिवसांपूर्वी येथील रहिवाशांनी शूटिंग दरम्यान आमिर आणि त्याच्या टीमवर कचरा फेकल्याचा आणि घाण पसरवल्याचा आरोप करत एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रोडक्शन हाऊसने यावर ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं होतं. 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटात आमीर खानबरोबर करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचं निम्म्याहून अधिक शूटिंग झालं आहे. ज्यासाठी देशाच्या बर्‍याच भागात शूटिंग करण्यात आलं आहे.