'आई कुठे काय करते?' मालिकेतील आप्पा का आहेत मालिकेपासून दूर

मालिकेतील प्रत्येक पात्राने जिंकलंय प्रेक्षकांचं मन 

Updated: May 6, 2021, 11:02 AM IST
'आई कुठे काय करते?' मालिकेतील आप्पा का आहेत मालिकेपासून दूर  title=

मुंबई : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'. या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकल आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राशी कलाकार एकरूप झाले आहेत. याचाच अनुभव प्रेक्षकांच्या खासगी आयुष्यातही दिसून येतो. या मालिकेतील एकही कलाकार दिसेनासा झाला की चाहत्यांना मोठा प्रश्न पडतो. सध्या समृद्धी निवासमधील प्रमुख आप्पा मालिकेत दिसत नाहीत. 

मालिकेत सध्या अनघा आणि अभिच्या साखरपुड्याची गडबड आहे. सगळेजण कोकणातील घरात गेले आहेत. पण या सगळ्यांसोबतच आपा कुठे दिसत नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे की, आप्पा नेमके कुठे गेलेत? ('आई कुठे काय करते', मालिकेतून ईशा घेणार एक्झिट?)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kishor Mahabole (@kishormahabole)

आप्पांचं पात्र किशोर महाबोळे साकारत आहेत. किशोर यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून ते मालिकेच्या शुटिंगकरता आलेले नाहीत. प्रेक्षकांना ही माहिती मिळाल्यानंतर आता त्यांच्या प्रश्नांचे निरसन झाले आहे. 

आप्पा अनघा आणि अभिषेकच्या साखरपुड्याला उपस्थित राहणार आहेत. मालिकेतील त्याची लगबग पाहायला मिळत आहे. मालिकेत आप्पा त्यांच्या भावाच्या आजारपणामुळे बाहेर गेले आहेत. त्यामुळे ते साखरपुड्याच्या दिवशी उपस्थित राहणार आहेत.