'आमचं लग्न फक्त नावापुरतं'... अभिनेत्रीचं बोलणं ऐकून चाहते आश्चर्यचकित

बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या स्पष्टवादी वक्तंव्यामुळे नेहमी चर्चेत असते.

Updated: Mar 21, 2022, 09:04 PM IST
'आमचं लग्न फक्त नावापुरतं'... अभिनेत्रीचं बोलणं ऐकून चाहते आश्चर्यचकित title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या स्पष्टवादी वक्तंव्यामुळे नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपुर्वीच अभिनेत्रीने लग्न केलं. विवाहित अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने लग्नानंतर तिचे आयुष्य कसं चाललं आहे याचा खुलासा केला आहे. करिश्मा तन्ना सध्या तिच्या नवविवाहित आयुष्याचा खूप आनंद घेत आहे. करिश्मा नुकतीच एका कार्यक्रमात दिसली. यावेळी तिला विचारण्यात आलं की, लग्नानंतर तिच्या आयुष्यात काय बदल झाले आहेत. या प्रश्नावर करिश्माने अतिशय मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं आहे.

विवाहीत जीवनावर करिश्माचं उत्तर
करिश्मा तन्ना म्हणाली, "आमच्यात लग्न हे नावापुरतं आहे. मिसेस हा फक्त एक टॅग आहे. पण मला वाटतं की आम्ही अजूनही एकमेकांचे बेस्टफ्रेंड आहोत. वरुण अजूनही मला त्याची गर्लफ्रेंड म्हणतो आणि मी त्याला माझा बॉयफ्रेंड म्हणते. त्यामुळे अजूनही आमचं तेच सुरू आहे." करिश्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांना अभिनेत्रीची ही बिंधास्त स्टाईल खूप आवडली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

5 फेब्रुवारीला झालं करिश्माचं लग्न
करिश्माने 5 फेब्रुवारी रोजी  बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत लग्न केलं. अभिनेत्रीने तिच्या लग्नाच्या फंक्शन्सचे काही फोटो आणि व्हिडिओही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. लग्नानंतरही ती सतत तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते.