मुंबई : साऊथ चित्रपटांची सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिचा त्रास कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. घटस्फोटाच्या वेदनांवर मात केल्यानंतर अभिनेत्रीवर आता आणखी एक संकट कोसळलं आहे. समंथाच्या नवीन गाण्याबाबत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. हे गाणं अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा सिनेमा 'पुष्पा द राइज' मधील आहे. ज्यामध्ये समंथाने डान्स केला आहे. या गाण्याच्या लिरिक्सला घेवून पुरुषांसाठी काम करणारी संस्थाने सामंथाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पुष्पा द राइज या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. समंथाने या चित्रपटात 'ओ अंथिया ओ.. ओ. अँथिया' आयटम साँग केलं आहे. या गाण्यावरून सध्या गोंधळ सुरू आहे. तक्रारदार पुरुषांच्या पुरुषांसाठी काम करणाऱ्या संस्थेचा गाण्याच्या बोलांवर आक्षेप आहे.
हे गाणं पुरुषांबद्दलची घाणेरडी विचारसरणी व्यक्त करतेय, असं त्यांचं म्हणणं आहे. या गाण्यातून असं दिसतंय की, पुरुष नेहमीच सेक्सचा विचार करत असतात. हे गाणे चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी या संघटनेने केली आहे. पुष्पा द राइज हा चित्रपट तेलगू, तमिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड अशा 6 वेगवेगळ्या भाषांमध्ये बनवला गेला आहे. जो 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा आंध्र प्रदेशातील जंगलात होणाऱ्या चंदनाच्या तस्करीवर आधारित आहे.
सिनेमाचा ट्रेलर आधीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटासोबत समंथाच्या आयटम साँगवर निर्मातेही खूप उत्सुक होते. हे गाणं रिलीज होण्यापूर्वी ते म्हणाले होते की, हे गाणं या वर्षातील सर्वात धमाकेदार गाणं असणार आहे मात्र आता ते वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.