नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलीवुडचा 'खिलाडी' अक्षय कुमारचा चर्चेत असलेला सिनेमा '2.0' सिनेमागृहात रिलीज झालायं. गेले कित्येक दिवस प्रेक्षक या सिनेमाची वाट पाहत होते. यामुळेच अनेकजण ढोल ताशे घेऊन सिनेमागृहात पोहोचले आणि सर्वांनी मिळून डान्स देखील केला. गुरूवारी रिलीज झालेला '2.0' पाहण्यासाठी गेलेल्या लोकांनी रजनीकांत आणि अक्षय कुमारच्या सिनेमाचं फटाके वाजवून, मिठाई वाटून स्वागत केलं.
#2Point0 our celebration time starts waiting for Thalaiavar pic.twitter.com/6IQupiS3nD
— ΛПGЯY ЯӨBӨƬ 2.0 (@IamAngryFellow) November 28, 2018
'2.0' हा रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर सायन्स फिक्शन सिनेमा आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासातील हा सर्वात महागडा सिनेमा आहे. साधारण 600 कोटी रुपयांचं बजेट असलेला हा सिनेमा देशभरात 6 हजारहून जास्त थिएटरमध्ये दाखवण्यात येतोयं. सिनेमाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता असून याची अॅडव्हान्स बुकिंगही सुरू झाली आहे. यावरून चांगली कमाई होईल याचा अंदाज लावता येऊ शकतो.
या सिनेमाने रिलीजच्या आधीच 500 कोटीची कमाई केल्याचे सांगण्यात येतंय. भारतीय सिनेमाच्या इतिहासात याआधी असं कधी झालं नव्हतं.
'2.0' सिनेमाचा हिरो भलेही रजनीकांत आहे पण बॉलीवुड स्टार अक्षय कुमार देखील दमदार खलनायकाच्या भुमिकेत दिसतोय. सिनेमाला मिळालेल्या ग्रॅण्ड ओपनिंगमुळे हा सिनेमा अक्षयसाठी देखील खास असणार आहे.
अक्षयच्या आतापर्यंतच्या सिनेमात 'गोल्ड'ने पहिल्या दिवशी 25.25 कोटी रुपयांचे कलेक्शन केलं होतं. '2.0' चं हिंदी वर्जन पहिल्या दिवशी 30 कोटीहून अधिक कमाई करेल असं मानलं जात आहे.
Morning 5.00 clock show #2Point0 pic.twitter.com/CauxainDhz
— Gopi s (@Gopi_vipermass3) November 29, 2018
काही दिवसांपुर्वी आलेल्या ठग्ज ऑफ हिंदुस्तानने हिंदी आणि अन्य भाषांमध्ये मिळून पहिल्या दिवशी 70 कोटींची कमाई केली.
'2.0' सिनेमातही तितकीच तगडी स्टारकास्ट आहे. त्यामुळे 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' चा रेकॉर्ड आरामात तुटेल यात शंका नाही.