JEE Main, NEET ची परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार

यापुढे JEE Main, NIIT वर्षातून दोन वेळा होणार आहेत.  NIIT, JEE Main, C MAT आणि GMAT या सर्व परीक्षा आता नॅशनल टेस्टींग एजन्सी घेणार आहे.. 

Updated: Jul 7, 2018, 04:44 PM IST
JEE Main, NEET ची परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार title=

नवी दिल्ली : यापुढे JEE Main, NIIT वर्षातून दोन वेळा होणार आहेत.  NIIT, JEE Main, C MAT आणि GMAT या सर्व परीक्षा आता नॅशनल टेस्टींग एजन्सी घेणार आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर या परीक्षा होणार असून या सर्व परीक्षा संगणकीय पद्धतीनं होणार आहेत. अभ्यासक्रम, भाषा आणि प्रश्नावलीत यापैकी काहीच बदल होणार नाही केवळ परिक्षेची पद्धतच  बदलणार आहे. त्यामुळे  लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

ठळकबाबी

- नॅशनल टेस्टींग एजन्सीने कामाला केली सुरुवात
- सर्व कॉम्प्युटराईज पद्धतीनं होणार
- आंतरराष्ट्रीय स्थरावर या परीक्षा घेणार 
- यापुढे NIIT, JEE Main & C MAT & GMAT या सर्व परिक्षा आता नॅशनल टेस्टींग एजन्सी करणार
- लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार 
- JEE मेन्स NIIT वर्षातून दोन वेळा होणार
- याबद्दलची सर्व माहिती लवकरच वेबसाईटला देणार
- अभ्यासक्रम, भाषा, प्रश्नावली यापैकी काहीच बदल होणार नाही 
- केवळ परीक्षेची पद्धत बदलणार