आई, मुलगी एकाचवेळी दहावी पास होण्याची कहाणी

दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यानंतर अनेक गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाची कहाणी तुम्ही पाहिली असेलच.

Updated: Jun 15, 2017, 09:02 PM IST
आई, मुलगी एकाचवेळी दहावी पास होण्याची कहाणी title=

दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई : दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यानंतर अनेक गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाची कहाणी तुम्ही पाहिली असेलच. पण ही आहे एका माय लेकीच्या जिद्दीची कहाणी. बटे सन्नाटा सिनेमाप्रमाणे वरळीत राहणाऱ्या रणपिसे कुटुंबियांच्या घरी प्रत्यक्षात पाहायला मिळालं. 

सिनेमात ज्या प्रमाणे मायलेकी एकत्र शाळेत जाऊन परीक्षा पास होतात. त्याचप्रमाणे संजन रणपिसे आणि तिची आई रंजना रणपिसे यांनी यंदा दहावीची परीक्षा पास केली. संजनाला ८२ टक्के गुण मिळाले तर रंजनाला ५२ टक्के. परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी संजनाने आईला मदत केलीच. एवढंच नाही तर अनेकवेळा मुलीने आईचा अभ्यासही घेतला. 

आर्थिक परिस्थितीमुळे रंजनांना नववीनंतर शाळा सोडावी लागली. त्यानंतर त्यांचं लग्न झालं. त्या संसारात व्यस्त झाल्या. गृहिणी असल्यामुळे घरकाम आणि मुलांचा सांभाळ करत त्यांनी रात्रशाळेत अभ्यास करून दहावीची परीक्षा दिला. त्यात त्या पासही झाल्या. त्यामुळे त्यांची ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे.