मुंबई : इंटिग्रेटेड कोर्स करणाऱ्या विध्यार्थ्यांनी जर महाविद्यालयात ८० टक्क्यांपेक्षा कमी हजेरी लावली तर त्यांना बारावी परीक्षेसाठी अपात्र केलं जाईल.
पुढल्या वर्षीपासून असा नियम लागू करणार असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या विषयावर बोलताना कारवाईचा अधिकार राज्यपालांकडे असल्याचं ते म्हणाले.