तरुणांना भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी

तुम्ही पदवीधर असाल तर भारतीय नौदलात काम करण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे. भारतीय नौदलात अनेक पदांवर भरती केली जात आहे. यासाठी नौदलाकडूम नोटिफिकेशनही पाठवण्यात आलेय. 

Updated: Oct 16, 2017, 04:29 PM IST
तरुणांना भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी  title=
मुंबई : तुम्ही पदवीधर असाल तर भारतीय नौदलात काम करण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे. भारतीय नौदलात अनेक पदांवर भरती केली जात आहे. यासाठी नौदलाकडूम नोटिफिकेशनही पाठवण्यात आलेय. 
 
पदाचे नाव  - शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर
 
पदांची संख्या  - ४३
 
वयोमर्यादा - या पदासाठी उमेदवारांचे वय १८ ते २६ वर्षेदरम्यान असावे.
 
पात्रता - या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेची पदवी असणे गरजेचे आहे. तसेच पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांवनाही प्राथमिकता दिली जाईल. 
 
अर्ज करण्याची अंतिम तारीख - २० ऑक्टोबर २०१७
 
अर्जासाठीचे शुल्क - कोणत्याही उमेदवाराला अर्ज करताना शुल्क भरावयाचे नाही
 
असा करा अर्जwww.joinindiannavy.gov.in या वेबसाईटवर जाऊन नोकरीसंबंधीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करुन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा. 
 
निवड प्रक्रिया - शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर पदासाठी उमेदवारांना एसएसबी इंटरव्ह्यूचा सामना करावा लागेल. टेस्टमध्ये शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांचे इंटरव्ह्यू बंगळूरु, भोपाळ, कोईम्बतूर आणि विशाखापट्टणम येथे १७ डिसेंबर ते १८ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आलेत. हा इंटरव्ह्यू पास करणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाईल.