नवी दिल्ली : CBSE ने बोर्डाच्या पासिंग मार्कमध्ये बदल केला आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना आता पास होण्यासाठी कमीतकमी ३३ टक्क्यांची गरज असणार आहे. बोर्डाने एक नोटिफिकेशन जारी करत सांगितलं की यामध्ये इंटरनल एसेसमेंट आणि थेरीचे मार्क देखील ग्राह्य धरले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांना आता दोन्ही पॅटर्न मिळून ३३ टक्के मिळवावे लागणार आहेत. ज्यामध्ये २० टक्के इंटरनल आणि ८० टक्के थेरीचे असणार आहेत. विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सीबीएसई बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
हा नवा नियम याच वर्षापासून लागू होणार आहे. याआधी विद्यार्थ्यांना थेरी आणि इंटरनल या दोन्ही पॅटर्नमध्ये ३३ टक्के गुण मिळवावे लागत होते पण आता यातून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे.
हा नवा नियम अतिरिक्त विषयांसाठी देखील लागू असणार आहे. नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं आहे की, हे पासिंग मार्क्सचं पॅटर्न वोकेशनल विषयांसाठी लागू नसणार आहेत. वोकेशनल विषयांसाठी इंटरनल एससमेंटसाठी ५० गुण आवश्यक आहेत.