सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ(सीबीएसई)कडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. विद्यार्थी Cbseresults.nic.in अथवा Cbse.nic.in या साईटवर आपला निकाल पाहू शकतात.

Updated: Jun 3, 2017, 06:12 PM IST
सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर title=

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ(सीबीएसई)कडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. विद्यार्थी Cbseresults.nic.in अथवा Cbse.nic.in या साईटवर आपला निकाल पाहू शकतात.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निकाल घोषित कऱण्यात आला. यंदाच्या निकालाची टक्केवारी गेल्यावर्षीच्या तुलनेत घटलीये.

गेल्यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९६.२१ इतकी होती. मात्र यंदा ९०.९५ टक्के विद्यार्थ्यी उत्तीर्ण झालेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह, अलाहाबाद, चेन्नई, डेहराडून आणि त्रिवेंद्रम विभागाचे निकालही जाहीर झालेत. 

१६, ६७,५७३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. गेल्या आठवड्यात २८मेला सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता.