नवी दिल्ली : सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशन (CBSE)चा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. (CBSE 10th Class Result 2020) ची घोषणा झाली असून cbse.nic.in आणि cbseresults.nic.in वर निकाल पाहता येणार आहे. निकाल डिजीलॉकर आणि उमंग ऐप वर उपलब्ध असेल. यावर्षी 91.46% टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ज्यामध्ये 93.31% मुली तर 90.14% मुलांचा समावेश आहे. त्रिवेंद्रम, चेन्नई आणि बंगळुरू या 3 शहरातील विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवलं आहे.
मागील वर्षी देखील त्रिवेंद्रम पहिल्या स्थानावर होतं. येथे 99.85% विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर चेन्नई पुन्हा दुसऱ्या स्थानावर आहे. मागील वर्षी येथे 99% विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
कोरोनामुळे यंदा काही राहिलेले पेपर रद्द करण्यात आले होते.
डिजिलॉकर ऐप: भारत सरकारने डिजिटल शैक्षणिक कागदपत्रांसाठी नवा डिजिटल ऐप आणला आहे. डिजिलॉकर ऐपवर 10 वीचा निकाल, मायग्रेशन सर्टिफिकेट आणि पास सर्टिफिकेट अपलोड केला जाईल. येथे विद्यार्थी आपला निकाल पाहू शकता. यासाठी आधी विद्यार्थ्यांना digilocker.gov.in वर जावून रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.