रजनीकांत आहेत या क्रिकेटरचे फॅन

दक्षिण भारतातला सुपरस्टार रजनीकांत यांचे देशभरात आणि जगभरात लाखो फॅन्स आहेत. या अभिनेत्याची पूजा करणारे देखील चाहते आहे. पण रजनीकांत मात्र एका क्रिकेटरचे फॅन आहेत. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 8, 2018, 11:03 AM IST
रजनीकांत आहेत या क्रिकेटरचे फॅन title=

मुंबई : दक्षिण भारतातला सुपरस्टार रजनीकांत यांचे देशभरात आणि जगभरात लाखो फॅन्स आहेत. या अभिनेत्याची पूजा करणारे देखील चाहते आहे. पण रजनीकांत मात्र एका क्रिकेटरचे फॅन आहेत. 

क्रिकेटरचे फॅन

२०११ मध्ये वर्ल्डकप विजेता टीमचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे तसे लाखो फॅन्स आहेत पण त्याच्या फॅन्सच्या यादीत एका सुपरस्टार देखील नाव आहे. ते म्हणजे रजनीकांत.

क्रिकेटची ही आवड

एका कार्यक्रमात रजनीकांत यांना जेव्हा विचारलं गेलं की, काय ते क्रिकेट पाहता? त्यावेळी त्यांनी म्हटलं की, ते खूप आधीपासून भारतीय टीमचे फॅन आहेत. पुढे जेव्हा त्यांना त्यांचा आवडता खेळाडू विचारला गेला तेव्हा त्यांनी महेंद्र सिंह धोनीचं नाव घेतलं.