मुंबई : भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या निवृतीनंतर देशासह जगातून प्रतिक्रिया येतायत. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अध्यक्ष सौरव गांगुली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी देखील धोनीप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गांगुलीने धोनीचे तोंडभरुन कौतूक केलंय.
हा एका युगाचा अंत आहे. तो भारत आणि जगातील क्रिकेटसाठी उत्तम खेळाडू राहीला अशी प्रतिक्रिया सौरव गांगुलीने बीसीसीआयतर्फे दिली. त्याची कप्तानीची क्षमता एकदम वेगळी होती. क्रिकेटच्या छोट्या फॉर्मेटमध्ये याची बरोबरी करणं कठीण होईल असेही तो म्हणाले.
सुरुवातीच्या दिवसात धोनीच्या बॅटींगने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. प्रत्येक गोष्टीचा अंत आहे आणि हा शेवट गोड आहे. विकेटकिपर्स म्हणून ओळख बनवून देशाचं नाव रोशन करता येण्याचं हे मुर्तीमंत उदाहरण आहे. धोनीसारखी नेतृत्व क्षमता खूप मिळणं कठीण आहे. त्याचे करियर खूप छान होतं. त्याला खूप शुभेच्छा देतो असं बीसीसीआयतर्फे लिहिण्यात आलं.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ट्वीट करुन आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. सचिनचं विश्वकप जिंकण्याचं स्वप्न धोनीच्या कॅप्टनसीमध्ये पूर्ण झालं होतं. त्यामुळे २०११ हा क्षण स्पेशल असल्याचे सचिनने म्हटलंय.
Your contribution to Indian cricket has been immense, @msdhoni. Winning the 2011 World Cup together has been the best moment of my life. Wishing you and your family all the very best for your 2nd innings. pic.twitter.com/5lRYyPFXcp
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 15, 2020
भारतीय क्रिकेटमध्ये आपलं योगदान खूप मोठं आहे. तुझ्यासोबत २०११ विश्वकप जिंकणं आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता. तुला आणि तुझ्या परिवाराला सेकंड इनिंगसाठी शुभेच्छा ! असं ट्वीट सचिनने केलंय.
इन्स्टाग्रामवर धोनीने एक व्हिडिओ पोस्ट करून आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. एवढे वर्ष दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आपण सगळ्यांचे धन्यवाद देतो, असं धोनी म्हणाला आहे. इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनीने 'मे पल दो पल का शायर हूं' हे गाणं ठेवलं आहे.
२००४ साली धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. २००७ साली टी-२० वर्ल्ड कपमध्ये धोनीने पहिल्यांदाच भारताचं कर्णधारपद भूषवलं. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सीरिजमध्ये धोनीने भारताला २००७ सालच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून दिला. यानंतर २००८ साली ऑस्ट्रेलियातही भारताने वनडे सीरिज धोनीच्याच नेतृत्वात जिंकली.
२०११ सालीही धोनी कर्णधार असताना भारताने ५० ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकला. श्रीलंकेविरुद्धच्या फायनलमध्ये धोनीने मॅच विनिंग खेळी करत भारताला २८ वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकवून दिला. यानंतर २०१३ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताचा विजय झाला तेव्हा धोनी कर्णधार होता. आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे.
धोनीने ३५० वनडेमध्ये ५०.५८ च्या सरासरीने १०,७७३ रन केले, यामध्ये १० शतकं आणि ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर ९८ टी-२० मॅचमध्ये धोनीने ३७.६ च्या सरासरीने १,६१७ रन केले. टी-२० क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर २ अर्धशतकं आहेत. २०१४ सालीच धोनीने टेस्ट क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतली होती. ९० टेस्ट मॅचमध्ये धोनीने ३८.०९ च्या सरासरीने ४,८७६ रन केले. यामध्ये ६ शतकं आणि ३३ अर्धशतकं होती.
९ जूलै २०१९ ला एमएस धोनी शेवटचा मैदानात दिसला होता. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनल मॅचनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही.