मुंबई : संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूच्या भीती खाली वावरत आहे. हजारो लोकांनी आपला जीव गमावला. या साथीच्या आजारामुळे जणू काही संपूर्ण जग थांबले आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे टोकियो ऑलिम्पिकही रद्द होण्याच्या मार्गावर आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने कोरोना महामारीसाठी चीनला दोषी ठरवलं आहे. एकामागे एक ट्विट करत त्याने चीनवर हल्ला केला आहे.
यापूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही चीनला या परिस्थितीसाठी जबाबदार धरले होते. त्याने आपल्या यूट्यूब वाहिनीवर व्हिडिओ शेअर करुन चीनवर जोरदार हल्ला केला.
पीटरसनने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कुत्रा शिजविला जात होता. त्याने ट्विट करत म्हटलं की, 'मला चीनमधील बाजाराचा व्हिडिओ पाठविण्यात आला, जिथे ते उकळत्या पाण्यात जिवंत असलेला कुत्रा टाकत आहेत' आणि जग लॉकडाउन आहे!
I got sent a video of a market in China where they’re cooking a dog that is alive in boiling water!!!!!
WTF!!!!!!
And the world is now locked down!
F......G bastards!
— Kevin Pietersen (@KP24) March 23, 2020
केव्हिन पीटरसनने आधी लिहिले की, कोरोना कोठे सुरू झाला? कोरोनो विषाणूचा उगम वुहानचा जिथे घाणेरडा बाजार आहे, जेथे मृत आणि जिवंत प्राणी दोन्ही विकले जातात.
How did the outbreak start?
The source of the coronavirus is believed to be a "wet market" in Wuhan which sold both dead and live animals.
Sick & twisted!!!!!!
— Kevin Pietersen (@KP24) March 23, 2020
शोएब अख्तर म्हणाला होता, 'तुम्हाला वटवागुळ खाण्याची किंवा त्याचे रक्त आणि लघवी पिण्याची काय गरज आहे? यामुळे, हा विषाणू जगभर पसरला. मी चिनी लोकांबद्दल बोलत आहे. त्यांनी संपूर्ण जग अडचणीत आणले. आपण वटवाकूळ, कुत्रे आणि मांजरी कसे खाऊ शकता हे मला समजत नाही. मला खरोखर खूप राग येतो आहे.
अख्तर म्हणाला की, "मी चिनी लोकांच्या विरोधात नाही, परंतु मी या प्रकारच्या जीवनशैलीविरूद्ध आहे." मी समजू शकतो की ही. त्यांची संस्कृती असू शकते.' पण त्याने तो व्हिडिओ नंतर काढून टाकला.