दयाशंकर मिश्र : आम्ही जबलपूरला प्रवासात होतो, प्रवास सुरू होताच आमच्या ट्रेनमधील कोचमध्ये आमच्या भागात, उत्साहाचं वातावरण दिसायला लागलं, गप्पांची मैफल रंगली. विशेष म्हणजे आमचे यात्रेकरूंचे तीनही गट एकमेकांना ओळखत नव्हते. पर फरीदाबाद आणि मंडळाचे दोन प्रवासी कुटूंब आमच्या असे काही मिसळले की, प्रवासाला उत्साहात सुरू झाला. पहिल्यांदा संवाद राजकारणावरून सुरू झाला, आणि विषय जीवनातील अनेक विषयांकडे वळला.
गप्पांची सुरूवात खासगी अनुभव सांगण्यापासून सुरू झाला. आमच्या रंगात आलेल्या गप्पा ऐकून एक तरूण प्रवासी, एवढा काही उत्साहित झाला की, यानंतर त्यानेही आपली मतं मांडण्यास सुरूवात केली. आम्ही देखील त्याचं स्वागतंच केलं, या जीवन संवादाचा एक अनोखा अनुभव होता. येथे प्रत्येकासाठी फक्त एक शिस्त होती, बोलणाऱ्याला ऐकायचं होतं.
आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळणे, हा देखील दुर्मिळ अनुभवच आहे. आपण स्वत:चं ऐकण्यात एवढे व्यस्त झालो आहोत की, आपण ऐकणं देखील आपण बंद केलं आहे. या संवादात ६ जणं शिस्तीत एवढे बुडून गेलो की, ऐकवण्यापेक्षा, खूप ऐकण्यावर लक्ष होतं. आता प्रवास अधिक सर्जनशील झाला होता. यात जे अमूल्य अनुभव मिळाले, त्यातील काही येथे देत आहे.
1. ‘तुटलेला’ पुल : अनेक वेळा असं होतं की आपण एका क्षणाची शिक्षा, आपण स्वत:ला आणि आपल्या प्रिय व्यक्तींना जीवनभर देतो, रोशन सांगत होता की, त्याच्या चुलत भावाच्या लग्नात त्याला एका गोष्टीवरून जरा जास्तच वाईट वाटलं, ते लग्न सोडून निघून गेले, या लग्नात त्यांना 'रिस्पेक्ट' न मिळाल्याने ते नाराज झाले. हा चुलत भाऊ लहानपणापासून त्यांच्या बरोबर राहिला होता, मात्र आता ९ वर्षापासून या भावापासून संबंध तुटलेले आहेत.
2. काही दिवसाआधी रोशनला जाणवलं की, त्याच्या भावासोबत त्याचं बोलणं बंद आहे, आणि त्याचं दडपण त्याच्या मनावर सतत येत होतं, त्याच्या डोक्यावर काही तरी ओझं आहे, मन आणि आत्म्यावर ते जड होतंय, रोशनने एकेदिवशी भावाला फोन लावला, मोठा असूनही आपल्या चुकीबद्दल माफी मागितली.
3. संवादाचा हा पूल एका बाजूने जसाही जोडण्यात आला, दोन्ही बाजूने वाहतूक सुरू झाली, फक्त रोशनच्या मनातलं ओझं नाही उतरलं, तर दोन्ही परिवारांमध्ये विचार आणि आनंदाचा स्पीड ब्रेकरच निघून गेला.
4. रोशनप्रमाणेच सहप्रवासी प्रिया गोयलने एक प्रेरणादायक कहाणी सांगितली, दिल्लीत दिवाळीत जेव्हा लोक त्यांच्या घरी येत असत, तेव्हा लोकांजवळ बसायला, बोलायला तिला वेळ मिळत नव्हता, शेजारचे घराच्या उंबरठ्यावरूनच भेट देऊन निघून जात होते, प्रियाने हळू हळू आपल्या शेजाऱ्यांना भेटवस्तू न देण्यासाठी तयार केलं. कारण एकमेकांच्या भेटवस्तू पाहण्यात आणि त्यावर निरर्थक चर्चा करण्यावरचा वेळ वाचू शकेल. या सोबतच गरजू लोकांना काहीतरी मदत करता येईल यावर भर देण्यात आला.
5. प्रियाने सुरूवात केलेली गोष्ट रंगात आली, सध्या त्याच्या आजूबाजूला एकमेकांना भेट वस्त देण्याचं 'कल्चर' संपून गेलं आहे. यानंतर मात्र गरजूंना मदत मिळत आहे, ज्यांना खरोखर गरज आहे, याची देखील सुरूवात झाली.
या जीवनसंवादाची एक बाजू ही देखील आहे की, आपल्या जवळ प्रवासात पुरेसा वेळ असतो, फक्त अट हीच असते, आम्ही फक्त लहान लहान अनुभव जोडले पाहिजेत.
(लेखक 'झी न्यूज'चे डिजिटल एडिटर आहेत )
(https://twitter.com/dayashankarmi)
(तुमचे प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा : https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)