डिअर जिंदगी : तुमचा दृष्टीकोन काय सांगतो...!

दृष्टीकोनापेक्षा सुंदर वस्तू या जगात कोणतीच नाही. ही एक अतुलनीय योग्यता आहे. दृष्टीकोन बहुतांश वेळेस नैसर्गिकपणे आणि कधी कधी नकळतपणे तयार होतो.

Updated: Jun 19, 2018, 12:28 AM IST
डिअर जिंदगी : तुमचा दृष्टीकोन काय सांगतो...! title=

दयाशंकर मिश्र : दृष्टीकोन ! माझ्यासाठी जीवनातील सर्वात मोठा शब्द आहे. सर्व विषयासंबंधित आपला दृष्टीकोन कसा आहे, ते सर्वात महत्वाचं आहे. आपली योग्यता, निर्णय घेण्याची क्षमता, अडचणीत आपण कसं वागतो, हे सर्व आपल्याला एका मर्यादेपर्यंत पुढे नेण्याची क्षमता ठेवतं. पण आपल्याला आपलं लक्ष्य साध्य होतं असेल किंवा होत नसेल तर, त्याला फक्त आणि फक्त आपला दृष्टीकोन जबाबदार आहे.

दृष्टीकोनापेक्षा सुंदर वस्तू या जगात कोणतीच नाही. ही एक अतुलनीय योग्यता आहे. दृष्टीकोन बहुतांश वेळेस नैसर्गिकपणे आणि कधी कधी नकळतपणे तयार होतो. एका वातावरणात. एकाच वातावरणात वाढलेल्या, दोन लोकांच्या स्वभावात, वागण्यात जे अंतर असतं. खरं तर ते दृष्टीकोनातील अंतर असतं. तसं पाहिलं तर, काही लोक पुढे जाऊन, आपली संगत, अनुभवावरून आपल्या दृष्टीकोनात बदल करण्यात यशस्वी होतात. पण याला अपवाद म्हणूनच पाहायला पाहिजे.

ही गोष्ट ओळखण्याची एक मोठा साधा, सामान्य नियम आहे. आपल्या मित्रांवर एक नजर टाका, असे मित्र ज्यांना तुम्ही कमीत कमी, दहा वर्षापासून ओळखत होते. आता पाहा जे मित्र १० वर्षापूर्वी ज्या प्रकारचा विचार करत होते, ते अजूनही त्याचं प्रकारचा विचार करतात का. ज्यास्तच जास्त वेळेस, तुम्हाला लक्षात येईल की, ते अजूनही आपल्या 'थॉटलाईन'च्या आसपासंच आहेत. विचार करणे आणि निर्णय घेणे, समजुतदारपणा दाखवणे हे सर्व आपल्या 'थॉटलाईन'च्या आसपासंच असतं.

आपले मित्र काही विश्वासी, अंधविश्वासू, सहज आणि काही नेहमीच संशयात असल्यासारखे वाटतात. ते असे का आहेत, यासाठी एक समजून घेणे महत्वाचं आहे की, त्यांची वाढ कोणत्या वातावरणात झाली. यानंतर त्यांनी आपल्या काही गोष्टी स्वीकारण्यात किती 'अॅप्रोच' दाखवला.

चला, दृष्टीकोनच्या सामान्य उदाहरणाला भेटू या, लग्न, भारतीय लग्नात आपला दृष्टीकोनाच सर्वात सरळ उदाहरण आहे. येथे हुंडा, आणि रितीरिवाजाच्या नावाखाली वधू पित्याची अशी वाट लावतात, अशा वस्तू मागतात की त्या पुरवत त्यांची वाट लागते. यावेळी तरूण नेहमी मौन बाळगताना दिसतात. अनेक वेळा अशा वस्तू सन्मान म्हणून स्वीकारल्या जातात. 

असा तरूण अजून पाहिलेला नाही की, तो समोर येईल आणि सांगेन की, हे योग्य नाही. आपण ९९ टक्के प्रकरणात असंच पाहिलं आहे की, युवक अतिशय शांत राहतात. ते म्हणतात की, ते मोठ्यांचा सन्मान करतात, म्हणून शांत बसतात. भारतात मुलींच्या सामाजिक स्थितीत तसा सुधार दिसत नाही. जो दिसला पाहिजे होता. शिक्षण, उच्च शिक्षणनंतरही तरूणांच्या दृष्टीकोनात मोठा बदल होणे गरजेचे आहे.

जाऊ द्या, दुसऱ्यांबद्दल किती बोलणार, आपल्या जीवनाविषयी जे काही साध्य होणार आहे, ते आपल्या योग्य दृष्टीकोनातूनच साध्य होणार आहे. इतर गोष्टी तर तुमचं इप्सित साध्य करण्यासाठी सहाय्यक आहेत, इतर तर केवळ फक्त दृष्टीकोन आहेत.

(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)

(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)