T20 World Cup: ऑस्ट्रेलियात टीम इंडियासोबत आहेत एक सौदर्यंवती, Photo पाहुन थक्क व्हाल

T20 World Cup: ऑस्ट्रेलियात टीम इंडियासोबत आहेत एक सौदर्यंवती, Photo पाहुन थक्क व्हाल

रोहित, विराटपेक्षाही तिची जास्त चर्चा, सौदर्यांत अभिनेत्रींना देखील सोडते मागे, कोण आहे 'ती' फिमेल स्टाफ? 

Updated: Oct 31, 2022, 08:12 PM IST
T20 World Cup: ऑस्ट्रेलियात टीम इंडियासोबत आहेत एक सौदर्यंवती, Photo पाहुन थक्क व्हाल title=

पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाचा (Team India) रविवारी दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट्स राखून पराभव केला. या पराभवानंतर टीम इंडियाचा सेमी फायनल पर्यंत पोहोचण्याचा मार्ग काहीसा खडतर झाला आहे. त्यामुळे आता टीम इंडियासाठी पुढील दोन सामने जिंकणे गरजेचे असणार आहे. त्यात आता टीम इंडियाची एक फिमेल सपोर्ट स्टाफ चर्चेत आली आहे. ही सपोर्ट स्टाफ दिसायला खुपच सुंदर आहे, त्यामुळे तीची चर्चा रंगली आहे. दरम्यान ही सपोर्ट स्टाफ आहे तरी कोण हे जाणून घेऊय़ात. 

टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या (Team India) 15 खेळाडूंसह 6 सपोर्ट स्टाफ देखील ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. या सपोर्ट स्टाफमध्ये एका फिमेल स्टाफचा समावेश करण्यात आला आहे. ही फिमेल स्टाफ आता चर्चेत आली आहे. त्यामुळे ही फिमेल स्टाफ आहे तरी कोण? अशी उत्सुकता क्रिकेट फॅन्सना लागली आहे.  

कोण आहे फिमेल स्टाफ ? 

टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये समाविष्ट असलेल्या एकमेव फिमेल स्टाफचे नाव राजलक्ष्मी अरोरा (Rajlaxmi Arora) आहे. राजल अरोरा असे तिचे टोपणनाव आहे. ती गेली अनेक वर्षे टीम इंडियाच्या प्रत्येक टूअरमध्ये दिसली आहे. मात्र फार क्वचितच वेळी ती चर्चेत आली आहे. 

सपोर्ट स्टाफमध्ये करते काय? 

राजलक्ष्मी अरोरा (Rajlaxmi Arora) बीसीसीआयमध्ये वरिष्ठ मीडिया निर्माता आहे. भारतीय खेळाडू आणि त्यांच्या क्रिकेट फॅन्समधला बाँड अधिक मजबूत करण्यात तिची महत्त्वाची भूमिका असते. तिच्यामुळेच फॅन्सना त्यांच्या आवडत्या खेळाडूंची भेट होत असते. 

करीअर

राजलक्ष्मी अरोराने (Rajlaxmi Arora) तिच्या व्यावसायिक करिअरची सुरुवात कंटेंट रायटर म्हणून केली. ती 2015 मध्ये सोशल मीडिया मॅनेजर म्हणून बीसीसीआयमध्ये सामील झाली होती आणि आता ती वरिष्ठ मीडिया निर्माता आहे. राजलक्ष्मी अरोरा हिने पुण्यातील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन (SIMC पुणे) मधून मीडियाची पदवी घेतली. राजलक्ष्मी अरोरा हिने रिव्हरडेल हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि शाळेच्या बास्केटबॉल आणि नेमबाजी संघाच्या सदस्या होत्या.

राज लक्ष्मी अरोरा (Rajlaxmi Arora)  यांची 2019 मध्ये BCCI च्या चार सदस्यीय अंतर्गत समितीचे (IC) प्रमुख म्हणून नामांकन करण्यात आले होते. राज लक्ष्मी अरोरा बीसीसीआयच्या अंतर्गत तक्रार समितीच्या प्रमुख होत्या, ज्याने खेळाडूंच्या गैरवर्तनासारख्या चिंतेवर लक्ष ठेवले होते.

चर्चेत येण्यामागचं कारण काय?

टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये एकमेव महिला असलेल्या राज लक्ष्मी अरोराचे (Rajlaxmi Arora) काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो क्रिकेट फॅन्सना खुप आवडले आहेत. अनेकांनी तिच्या सौदर्यांचे कौतूक केले आहेत. त्यामुळे तिची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. 

दरम्यान टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2022) टीम इंडियाचा (Team India) पुढील सामना बांगलादेशसोबत असणार आहे. या सामन्याकडे आता क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे.