हरभजन सिंगला मिळाली मोठी जबाबदारी, बनला कर्णधार

मुंबई : टीम इंडियामधून बाहेर असलेला भारताचा अनुभव गोलंदांज हरभजन सिंगला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

हरभजन सिंगला विजय हजारे ट्रॉफी वन-डे टूर्नामेंटमध्ये पंजाब टीमचा कर्णधार म्हणून निवडण्यात आलं आहे. टूर्नामेंट कर्नाटकच्या अलूरमध्ये 7 ते 16 फेब्रवारी दरम्यान खेळला जाणार आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाबचा पहिला सामना हरियाणाविरुद्ध 7 फेब्रुवारीला होणार आहे.

या टूर्नामेंटसाठी टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंगला उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. पीसीएचे चेयरमन माजी क्रिकेटर यशपाल शर्मा यांच्या नेतृत्वात टीममध्ये सीनियर सिलेक्शन कमेटीने या सीरीजसाठी संघाची निवड केली.

आयपीएल सीजन 11 च्या लिलावात हरभजन सिंगला चेन्नई सुपर किंग्सने 2 कोटींमध्ये खरेदी केलं. युवराज सिंगला किंग्स इलेवन पंजाबने 2 कोटींना खरेदी केलं होतं.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Harbhajan Singh become captain of Punjab team
News Source: 
Home Title: 

हरभजन सिंगला मिळाली मोठी जबाबदारी, बनला कर्णधार

हरभजन सिंगला मिळाली मोठी जबाबदारी, बनला कर्णधार
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
shailesh musale