जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू
जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू
मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांच्या निधनानंतर नवे सरकार स्थापन करण्यास उशिर झाल्याने जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आलेय.
PTI | Updated: Jan 10, 2016, 09:19 AM IST
श्रीनगर : मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांच्या निधनानंतर नवे सरकार स्थापन करण्यास उशिर झाल्याने जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आलेय.
जम्मू-काश्मीरमध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष (पीडीपी) आणि भाजप आघाडीचे सरकार आहे. मात्र, सईद यांच्या निधनानंतर आघाडीला सरकार स्थापन्यास विलंब झाल्याने येथे शनिवारी राज्यपाल राजवट लागू करण्यात आली.
राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली. राज्यपाल राजवट आणखी काही दिवसांसाठीच असेल, अशी शक्यता आहे. दरम्यान, पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता असून त्यानंतर ही राजवट संपुष्टात येईल.
जम्मू काश्मीरमध्ये एकाच वर्षात दुसऱ्यांदा राज्यपाल राजवट लागू झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारीत विधानसभा निवडणुकीनंतर राज्यपाल राजवट लागू झाली होती.