शिवसेनेचा ठाणेकरांसाठी वचननामा जाहीर

शिवसेनेचा ठाणेकरांसाठी वचननामा जाहीर

शिवसेना-भाजप युती तुटल्याचे जाहीर केल्यानंतर प्रथमच शिवसेनेने ठाण्यात आपला वचननामा जाहीर केला.  

Updated: Jan 31, 2017, 11:11 PM IST
शिवसेनेचा ठाणेकरांसाठी वचननामा जाहीर title=

ठाणे : शिवसेना-भाजप युती तुटल्याचे जाहीर केल्यानंतर प्रथमच शिवसेनेने ठाण्यात आपला वचननामा जाहीर केला. शिवसेनेच्या वचननाम्यात अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत.

रस्ते, आरोग्य सुविधा, उद्याने सुशोभीकरण, सेंट्रल पार्क, पालिकेचे स्वतःचे धरण, जलवाहतुकीला प्राधान्य, मेट्रो रुग्णालय, बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना सारख्या महत्वाकांशी योजनेचा शिवसेनेच्या वाचननाम्यात समावेश करण्यात आला आहे. 

आम्हला विकास कामे करायची आहेत. राजकारण नाही, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस सुरु करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.