सलमानच्या लग्नाची तारीख ठरली?
सलमानच्या लग्नाची तारीख ठरली?
सलमान खान आणि युलिया वंतूर यांना लग्नाला मुहूर्त सापडलाय.
Updated: Sep 3, 2016, 09:14 PM IST
मुंबई : सलमान खान आणि युलिया वंतूर यांना लग्नाला मुहूर्त सापडलाय. 18 नोव्हेंबरला हे दोघं लग्न करणार असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिली आहे. सलमानच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवसही नोव्हेंबरमध्ये असतो म्हणून सलमान नोव्हेंबरमध्येच लग्न करणार असल्याचं सलमाननं सांगितलं आहे.
एका पार्टीमध्ये सलमाननं त्याच्या लग्नाच्या तारखेची घोषणा केल्याचा दावा या इंग्रजी वृत्तपत्रानं केला आहे. सलमानच्या लग्नाला त्याचे जवळचे मित्र आणि परिवारातले एकूण 15 ते 20 जणं उपस्थित राहणार असल्याचंही समजतंय.