रेल्वे तिकीट : आरक्षित रद्दचा कालावधी वाढवला
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मेल-एक्स्प्रेस तिकिटे रद्द करण्याचा कालावधी वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय. या निर्णयाची अंमलबजावणी १ जुलैपासून केली जाणार आहे.
आरक्षित तिकिटे रद्द केल्यानंतर त्याचे रिफंड (परतावा) मिळविताना अनेक गैरव्यवहार होत असल्याचे पुढे आले आहे. याला आळा घालण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने तिकिटे रद्द करण्याचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नव्या नियमानुसार तिकीट रद्द करण्याचा कालावधी हा ४८ तास ते ट्रेन सुटण्याच्या अगोदर सहा तास असेल.
याआधी रेल्वेचे तिकिट रद्द करण्याचा कालावधी हा आधी २४ तास ते गाडी सुटण्याअगोदर ४ तास होता. तिकिटे रद्द करण्यासाठी एसी पहिला वर्ग आणि एक्झिक्युटिव्हसाठी १२० रुपये तर एसी पहिला वर्ग आणि दुसऱ्या वर्गासाठी १०० रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच एसी तिसरा वर्ग, तिसरा इकॉनॉमी आणि एसी चेअर कारसाठी ९० रुपये,स्लीपर कारसाठी ६० रुपये, तर सेकंड क्लाससाठी ३० रुपये आकारणी केली जाणार आहे, त्यामुळे तिकिट रद्दचा कालावधी वाढविला असला तरी जास्तीचे पैसे कट होणार असल्याने प्रवाशांतून नाराजी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
रेल्वे तिकीट : आरक्षित रद्दचा कालावधी वाढवला